Friday, December 18, 2009
अजब देसके गजब कायदे
- जर पत्नीने पतीविरुद्ध खोटी तक्रार केली, तर तिला समाजाची सहानुभूती मिळते, तर पतीला पोलीस कोठडी.
- जर पतीने पत्नी छळ करते अशी खरीखुरी तक्रार केली, तर समाज व कायद्याचे रक्षक त्याची खिल्ली उडवतात. सगळे त्याच्यावर हसतात, व त्याला म्हणतात, अरे मर्द हो, आणि दे तिच्या दोन मुस्काटात !
- हुंडाबळी साठी ३०४(ब) हे कलम आहे, तरी ४९८(अ) हे आणखी हे नवीन बिनडोक कलम बनविण्यात आले.
- स्त्री म्हणजे केवळ पत्नी, असे भारतीय कायदा म्हणतो. स्त्रीची बाकीची रूपे, कायद्याला मान्य नाहीत. स्त्री हि क्षणभरची पत्नी आणि अनंतकाळाची आई असे आपली संस्कृती सांगते. पण भारतीय कायद्यांनी आपली हि संस्कृती पायदळी तुडवली आहे. आई, वडील, भाऊ व बहिण, ह्यांना कायद्याचे कोणतेही संरक्षण नाही. सारे कायदे फक्त पत्नीला, असे हे मनोविकृत भारतीय कायदे.
- जर पत्नीने खोटी तक्रार केली असे कोर्टात सिद्ध जरी झाले, तरी कोर्ट असल्या दुष्ट स्त्रियांना "अबला नारी" म्हणून त्यांना काहीही शिक्षा करीत नाही.
Saturday, December 5, 2009
बाहेरख्याली पत्नीने केली पतीची हत्या !
वरील ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या बातमीत असे म्हटले आहे कि, एका पत्नीने, आपल्या प्रियकराबरोबर मिळून स्वतःच्या पतीची क्रूरपणे हत्या केली. पत्नी व तिचा प्रियकर सध्या फरार आहेत.
पत्नींच्या बाजूने कायदे असून देखील, काही बायका इतक्या खालच्या स्तराला जातात, हेच आश्चर्य. भारतीय पत्नींमध्ये व्याभिचार फार वाढत चालला आहे.
बाहेरख्याली पत्नीचा खून
http://www.dnaindia.com/mumbai/report_man-kills-wife-for-fling-with-clients_1292329
आजकाल समाजात विवाहबाह्य संबंधाना ऊत आला आहे. त्यात भरीस भर म्हणजे भारतीय कायद्यात, पत्नीला असले दुष्कर्म केल्या बद्दल कोणतीही सजा व काहीही होऊ शकत नाही. थोडक्यात कायद्यात पत्नींना असले प्रकार करायला उत्तेजनच दिले आहे. पतीने असे काही केले तर त्याबद्दल त्याच्याविरुद्ध पत्नीकडे बरेच कायदेशीर पर्याय आहेत. पण पतीला मात्र बाहेरख्याली पत्नीकडून मुक्तते साठी कायद्यात कोणतीही तरतूद नाही, हेदुर्दैव.
Saturday, November 14, 2009
केंद्र सरकारचा पोलीसांना ४९८अ मध्ये सबुरीचा सल्ला
http://www.indianexpress.com/news/cruel-marriage-law-being-misused-so-dont-rush-to-arrest-centre-to-states/536560/0
" अनेक वर्षापासून, भा. दं. सं ४९८अ वर प्रखर वाद चालू आहे, व सर्वोच्च व देशातील अनेक उच्च न्यायालायानीही हा कायदा रद्द करण्याची सरकारला अनेकवेळा विनंती केली होती. ह्या कायद्याचा अतिरेकी प्रमाणात गैरवापर होत आहे, आणि पती व त्याच्या कुटुंबियांना, त्यांच्या पत्नीच्या खोट्या तक्रारीवरून, कोणत्याही तपासा शिवाय, वा पुराव्याविना अटक करण्यात येते.
केंद्रीय गृह मंत्रालयाने, सगळ्या राज्य सरकारांना, कळविले आहे कि ४९८अ च्या प्रकरणांमध्ये, अटक हे पहिले पाऊल, न ठेवता, तो सर्वात शेवटचा उपाय ठेवावा. १३ ऑक्टोबरला पाठीवेलेल्या पत्रात ४९८अ चा मोठ्या प्रमाणावर होणारा गैरवापरामुळे हा सल्ला दिल्याचे म्हटले आहे.
"काही प्रकरणांमध्ये, पतीच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला, त्याचा काहीही संबंध नसला तरीही अटक करण्यात येते. बऱ्याच प्रकरणांमध्ये इतर कुठल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी ह्या कलमाचा दुरुपयोग केला जातो. अनेक प्रकरणांमध्ये क्षणिक रागामुळे, केसेस केल्या गेल्या, आणि त्यामुळे, अनेकांचे संसार कायमचे उध्वस्त झाले. जरी घटस्फोटाचा खटला चालू असला, तरी ४९८अ बिगर समजुतीचा असल्यामुळे ४९८अ चा खटला चालूच राहतो." असे पत्रात म्हटले आहे.
४९८अ, हे कलम १९८३ साली अस्तित्वात आले. त्यामध्ये विवाहितेचा हुंड्यासाठी छळ केल्यास पती व नातेवाईकांना कारावासाची शिक्षा होऊ शकते.
पत्रात पुढे असे म्हटले आहे, कि, न्यायालयाच्या निकालांचा आधार घेत, ह्या कलमामध्ये दुरुस्तीचा प्रयत्न केला गला, पण महिला संघटनांच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही.
सावित्री देवी वि. रमेश चांद आणि इतर(२००२) ह्या प्रकरणामध्ये, दिल्ली उच्च न्यायालयाने, असे म्हटले कि " ४९८अ चा गैरवापर .. हा विवाह संस्थेच्या मुळावर आघात करीत आहे, आणि सामाजिक स्वस्थ्या साठी हाकायदा अयोग्य आहे "
सर्वोच्च न्यायालयाने, सुशील कुमार वि. भारत सरकार, मध्ये पुढील मत नोंदविले आहे " ४९८अ चा हेतू हुंडा रोखणे हा आहे. पण बरेच प्रकार उघडकीस आले आहेत, ज्यात तक्रारी ह्या दुष्ट बुद्धीने केल्या गेल्या आहेत. हा गैरप्रकार कसा थांबवायचा हे सरकारने बघितले पाहिजे."
२००३ मध्ये मालीमाथ आयोगाने, ४९८अ हा जामीनपात्र व समजुतीचा करावा असे आपल्या अहवालात म्हटले होते.
Saturday, October 10, 2009
विनावडील मुले आणि लैंगिक छळ
भारतीय कायद्यांचा कल, नेहमी मुलांचा हक्क आईकडे देण्याकडे असतो. हा किती चुकीचा कल आहे, तो ह्याआकडेवारीवरून स्पष्ट होतो.
Thursday, September 17, 2009
उशिराने आलेलं शहाणपण
http://beta.esakal.com/Article/ArticlePage.aspx?Id=24A031AD-F40E-45E7-B61F-2054267AA199
त्यात एका घटस्फोटीत महिलेने स्वःताची चूक मान्य केली आहे. तिला तिच्या कृत्याचा आता पश्चाताप होतआहे. दुर्दैवाने पश्चाताप थोडा उशिरानेच झाला, पण देर आये दुरुस्त आये, सारखी परिस्थिती संसारात बहुतेकवेळा नसते. ह्याच्या पेक्षा वाईट पाळी खोट्या केसेस करणाऱ्या तरुणींवर येते, आणि येत राहणार आहे.
जरी लेखिकेने सगळं सांगितले नसेल, पण, कोर्टात तिच्या नवऱ्याला तिने फार त्रास दिला असेल हे निश्चित.
कोर्ट हे असल्या केसेस मध्ये नेहमी पत्नीच्या बाजूने पक्षपात करतात. हिंदू विवाह कायदा त्यांना तसे करायलाउत्तेजन देतो. हा कायदा अस्तित्वात आला आहे १९५५ मध्ये, आणि त्याला बदललेल्या सामाजिक परीस्थितेचेभान नाही आहे. कायदा अजून तरुण पत्नीला अबला समजतो, आणि तिच्या बाजूने पक्षपात करतो. मग तिचीबाजू कितीही लंगडी असली तरी. हा कायदा असल्या हेकेखोर पत्नींना आणखी उत्तेजन देतो, जेणेकरून त्याआपल्या पतीला असह्य असा मानसिक त्रास देतात. मुलांचा ताबा नेहमी पत्नीकडे जातो. जर तिने नकार दिलातरच पतीकडे जातो.
असो एका महिलेला तरी धडा मिळाला हेही नसे थोडके. :-)
Thursday, August 27, 2009
एका मातेचा उद्वेग
http://beta.esakal.com/2009/08/24194806/Mukapeeth-on-engagement.html
भरला संसार तिने केवळ आपला "इगो' सांभाळण्यासाठी मोडला आहे. मुलांना त्यांच्या बाबांपासून दूर करायचा हिला काय अधिकार आहे? संसाराची धूळधाण आम्हाला आता या वयात बघवत नाही.
आजकाल समाजात जी विषवल्ली झपाट्याने पसरली आहे, त्या विषवल्लीचा कसा नायनाट करावा या विचारानेच माझी मती मठ्ठ झाली आहे. संसार मांडताना- तो वाढविताना- तो जपताना सर्व गोष्टींत स्त्रीचा फार मोठा भाग असतो. मुलांवर संस्कार करण्यात, त्यांना घडविण्यात आईचा मोठा वाटा असतो. तिची ती फार मोठी जबाबदारी असते. पण आज पाहिले तर संस्कार करण्यात आईवडील कमी पडतात, की समाजातील घटकांचा परिणाम लहान वयापासून मुलामुलींवर होत आहे? पण उद्ध्वस्त होणारे संसार हे त्याचे कटुसत्य आहे. माझ्या मुलाच्या आयुष्याचेपण तिने असेच वाटोळे केले आहे.
दहा वर्षांपूर्वी आमच्या मुलाचा अवघ्या २४ व्या वर्षी प्रेमविवाह झाला (?). लग्नाअगोदरपासून तो परदेशात आहे. लग्नानंतर अवघ्या आठ दिवसांत ते दोघे तिकडे गेले. पहिले नवलाईचे दिवस संपेपर्यंत ती आमच्या तिघांशी ठीक वागत होती. पण तिचा खरा स्वभाव, तिचे खरे रूप नंतरच समोर यायला लागले. तिच्या दुसऱ्यावर हुकमत करायच्या स्वभावाकडे आमच्या मुलाने फारसे लक्ष न देता खतपाणी घातले, असे आज वाटते. आपल्या मनाविरुद्ध घडत आहे. म्हणजेच नवरा आपल्या मनासारखे वागत नाही म्हटल्यावर तिने त्याला खूप मानसिक त्रास द्यायला सुरवात केली. इतकी वर्षे तिचे ऐकत राहून शेवटी त्याचीपण सहनशक्ती संपली व आपल्यालाही मन आहे, मत आहे याची त्याला खरी जाणीव झाली आणि तिथेच सर्व बिनसले. लहानपणापासूनच अतिशय लाडात वाढलेली, वोळपरींश पर्रीीींश, दुसऱ्याबद्दल सतत संशय, फिल्मी वागणे, खोटे बोलणे, हट्टी-दुराग्रही अशा स्वभावामुळे मुलालापण तिच्याबरोबर संसार करण्याचा कंटाळा आला. तो या सर्व गोष्टी सहन करू शकत नव्हता. तिच्या आईचा स्वभाव असाच असल्यामुळे त्यांच्या घरातील वातावरणही विचित्रच आहे. त्याचा सर्व परिणाम तिच्यावर झाला आहे. आईने योग्य संस्कार न केल्यामुळे आज त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे.
खरे तर लग्नानंतर दोघेच राहत होते. त्यांच्या संसारात आम्ही दोघे नव्हतो. मुलाबरोबर ती सर्व जग फिरली आहे. सोन्यासारखा आठ वर्षांचा मुलगा आहे आणि मनासारखी मुलगी आहे. इतके सर्व सुख मागूनही मिळणार नाही असे आहे. आम्हाला मुलगी नसल्यामुळे आम्ही मुलगी समजून तिचे खूप लाड केले. पण अतिशय सुखामुळे की काय (सुख बोचणे म्हणतात तसे) तिने मागच्या वर्षी घर सोडले; स्वतःच्या दोन लहान मुलांना घेऊन! मुलगी िीश ार्रीींरीव असल्यामुळे आमच्या मुलाला मुलांची अतिशय काळजी वाटते. पण ही केवळ स्वतःच्या अहंकारापायी कसलाही विचार न करता घरातून निघून गेली आहे. यात लहान मुलांचा काय अपराध आहे? त्यांना त्यांच्या वडिलांना ती भेटू देत नाहीये! तिचे आईवडील याबद्दल काहीच बोलत नाहीत. आणि आम्ही भेटायला गेलो तर आमचा अपमानच केला. आमचा मुलगा भावनाप्रधान आहे, तर ती अतिशय िीरलींळलरश्र आहे. त्यामुळे या सर्वांचा मुलाच्या मनावर खूपच परिणाम झाला आहे. सर्वांनाच मनस्ताप झाला आहे.
भरला संसार तिने केवळ आपला "इगो' सांभाळण्यासाठी मोडला आहे. मुलांना त्यांच्या बाबांपासून दूर करायचा हिला काय अधिकार आहे? संसाराची धूळधाण आम्हाला आता या वयात बघवत नाहीये. आज मुलींच्या बाजूने न्यायालय बोलते. पण एका अभागी मुलाची दुर्दैवी आई विचारत आहे, की आमचे काय चुकले? जे आईवडील आपल्या मुलीला अशा प्रकारे साह्य करतात, पाठीशी घालतात, त्यांच्या लक्षात येत नाही का, की आपण आपल्याच मुलीच्या संसाराच्या नाशाला कारणीभूत आहोत! मुलगी जर तुम्हाला तिच्या भानगडीत पडू देत नाही, असे असेल तर निदान तिच्या वागण्याला प्रोत्साहन तरी देऊ नका! आईमुळे मुलांनापण भोगायला लागते आहे. यातून काही मार्ग तर सापडत नाहीये! आमच्यासारखी जगात भरपूर उदाहरणे असतील; पण तिला कसे समजवावे? मुलाला घटस्फोट घ्यायचा नाहीये; तर ती काहीच बोलायला तयार नाही. यातून काही मार्ग निघेल का? माझा प्रत्येक दिवस आसवांत वाहून जात आहे! एकुलत्या एक मुलाचे दुःख पाहवत नाही आणि मार्गही सापडत नाही, काय करू?
सौ. रंजना कुलकर्णी
पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याने पत्नीसह तिघांना सक्तमजुरी
ह्याही प्रकरणात बाहेरख्याली पत्नीने आपला अपराध लपविण्यासाठी उलट पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती.
http://beta.esakal.com/2009/08/27000830/pune-husband-suicide.html
पुणे - पतीचा मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या एका दुर्मिळ खटल्यात न्यायालयाने त्याच्या पत्नीसह, तिचे वडील आणि प्रियकराला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. पी. वाईकर यांच्यासमोर खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. विक्रम नारायण कांबळे (रा. कळस) याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपात न्यायालयाने त्याची पत्नी स्नेहलता ऊर्फ पिंकी विक्रम कांबळे, सासरे अशोक भीमराव कांबळे आणि रितेश गयाल (तिघे रा. संगमवाडी, खडकी) यांना दोषी ठरविले. विक्रम यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती. या तिघांमुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी विक्रम यांच्या खिशातून पोलिसांना मिळाली होती. ही चिठ्ठी आरोपींना दोषी ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली. चिठ्ठीतील हस्ताक्षर विक्रम यांचे असल्याचे तज्ज्ञांच्या अहवालातून स्पष्ट झाले होते. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील एम. डी. पिसाळ यांनी नऊ साक्षीदार तपासले.
विक्रम आणि स्नेहलता यांचा ता. 19 फेब्रुवारी 2006 रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर ती कोल्हापूर येथून दोन-तीन आठवड्यांत पुन्हा पुण्यात परत आली. तिने विक्रमला पुण्यात स्थायिक होण्याचा आग्रह धरला. त्यामुळे विक्रम हा कळस येथे येऊन राहू लागला. तो वाहनचालकाची नोकरी करीत होता. दरम्यान, स्नेहलता आणि रितेश यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे विक्रमने सासरे अशोक कांबळे यांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतरही त्यांच्या वर्तनात बदल झाला नाही. उलट आरोपींनी विक्रम आणि त्याच्या घरातील लोकांविरुद्ध पोलिसांकडे छळाची तक्रार केली. पोटगीसाठी दावा दाखल केला. हा मानसिक छळ सहन न झाल्याने विक्रमने आत्महत्या केली, अशी तक्रार त्यांचे भाऊ नारायण कांबळे यांनी दिली होती.
Sunday, August 16, 2009
हैदराबाद पोलिसांचे ४९८अ बद्दल प्रशंसनीय पाऊल
त्या नियमांचा स्वैर अनुवाद येथे दिला आहे. आशा करूया कि महाराष्ट्र पोलीस पण ह्यातून काही बोध घेतील.
१.) नेहमी लक्षात ठेवा पती पत्नी आणि मुलांनी आपसात चर्चा करावी, ती कौन्सेलिंगपेक्षा जास्त चांगली.
२.) माणसांकडून चुका होतातच. चुका दोन्ही बाजूनी होतात. आपल्या चुका लपविण्यासाठी कायद्याचा दुरुपयोग करू नये.
३.) पोलिसांकडे येण्यागोदर कौन्सेलिंग करावे.
४.) अतिरंजित करून काहीही सांगू नये. जे घडले आहे, ते स्पष्ट, व नेमकेपणाने सांगणे.
५.) ज्या माणसांचा सहभाग नाही, त्यांची उगाच नावे घेऊन त्याना विनाकारण गुंतवू नये.
६.) निट लक्षात ठेवा ४९८अ हा कायदा बदला घेण्यासाठी नाही आहे, तर ज्यांनी गुन्हा केला आहे, त्यांना शिक्षा देण्यासाठी आहे.
७.) तुमचा गैरफायदा घेणारे बरेच महाभाग असतात. ते तुम्हाला घटना अतिरंजित करून सांगायला प्रवृत्त करतील, तसेच ज्यांचा सहभाग नाही आहे अश्यांची नावे घ्यायला सांगतील, हुंडा मध्ये जास्त पैसे दिल्याचे सांगायला सांगतील, इत्यादी.
८.) जर तुम्हाला मदत हवी असेल, तर मान्यवर स्वयंसेवी संघटना, किंवा हेल्पलाईनशी संपर्क करणे. उगाच असल्या महाभागांकडे जाऊ नये, जे तुम्हाला पैसे उकलण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देतील.
९.) तक्रार करताना स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर रहा, व आपली तक्रार नीट वाचून घेणे.
१०.) बऱ्याच वेळा तक्रार कर्ते आपली केस मजबूत करण्यासाठी अतिरंजित व काल्पनिक आरोप करतात. कुठलीही केस मजबूत होण्यासाठी ठोस पुराव्यांची आवशकता असते. जर पुरावे नसतील, आणि फक्त बेछुट आरोप असतील, तर केस फार कमकुवत होते, आणि निरपराध व्यक्तींना त्रास होतो.
११.) जर कोणी पोलीस किंवा संबंधित अधिकारी पैसे मागत असेल, तर देऊ नये, व त्याच्या वरिष्ठ अधिकार्याकडे तक्रार करावी.
१२.) लक्षात ठेवा आपल्या नवऱ्याला, घटस्फोट मिळण्यासाठी ४९८अ चा गैरवापर करू नये. घटस्फोट मिळण्यासाठी इतर कायदे आहेत, त्यांचा आधार घ्यावा.
१३.) लक्षात ठेवा, ४९८अ आपल्या मुलांचा ताबा मिळविण्यासाठी नाही आहे. त्यासाठी वेगळे कायदे आहेत.
१४.) ज्या दिवशी तक्रार केली जाईल, त्याच दिवशी पोलिसांवर अटक करण्यासाठी दबाव टाकू नये. पुरावा गोळा करण्यासाठी वेळ लागतो. जर तुम्हाला पोलीसांना मदत करायचीच असेल तर, त्यांना पुरावे देणे.
१५.) संपूर्ण देशात ४९८अ मध्ये फार कमी प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध होतो. त्याची अनेक कारणे आहेत. पुराव्याशिवाय नुसते बेछुट व अतिरंजित आरोप करणे, खटला चालू असताना जबाब बदलणे, इत्यादी.
Tuesday, August 4, 2009
न्यायसंस्थेतील त्रुटी
एक उत्कृष्ट लेख
heeÛe Øeçve vÙeeÙemebmLesleer} $egšer otj PeeuÙee lejÛe KešuÙeeÛÙee efveJee[Ÿee}e Jesie µ KešuÙeeÛÙee efveJee[ŸeeÛee keâe}eJeOeer 15 Je - Ùee yeo}eveblej keâecekeâepe ieefleceeve JneÙe}e njkeâle veener. cee$e Heâkeäle DeejeKe[e leÙeej keâ¤ve Ûee}Ceej veener lej meJe&Ûe vÙeeÙee}Ùeerve Ùeb$eCee ieefleceeve keâjeJeer }eieCeej Deens. Deveskeâ ef"keâeCeer vÙeeÙee}Ùeele vÙeeÙeeOeerçeebÛÙee efjkeäle peeiee Yej}suÙee veenerle. keâener ef"keâeCeer keâejketâve Deensle, lej keâe@chÙegšj veener. Ùee meJe& iees°eRkeâ[s yeejkeâeF&ves }#e osCes DeeJeçÙekeâ Deens. leerve Je µ KešuÙeeÛee efveJee[e }Jekeâj PeeuÙeeJej he#ekeâejeJej DevÙeeÙe nesF&} keâeÙe? - JeemleefJekeâ heenlee ne efveCe&Ùe he#ekeâejeÛÙee efnleemee"erÛe keWâõ mejkeâej Iesle Deens. cee$e KešuÙeeleer} meJe& yeeyeer neleeUuÙeeefçeJeeÙe lees efvekeâe}er keâe{}e peele veener. vÙeeÙee}Ùeekeâ[tve Heâkeäle Keš}e GjkeâefJeCÙeeÛee ØeÙelve Pee}e lej cee$e he#ekeâejeJej DevÙeeÙe nesCÙeeÛeer oeš çekeäÙelee Deens. Deveskeâ KešuÙeebleer} mee#eeroej Je µ efoJemeWefoJeme vÙeeÙee}Ùeerve Øeef›eâÙesJej leeCe he[le Ûee}}e Deens... - Heâkeäle leeCeÛe he[le Ûee}}e veener lej KešuÙeebÛÙee [eWiejeKee}er vÙeeÙeJÙeJemLee oye}er ies}er Deens. osçeeleer} efJeefJeOe vÙeeÙee}ÙeebceOÙes oesve keâesšer 64 }eKe Keš}s Øe}befyele Deensle. Ùee KešuÙeeleer} he#ekeâejebÛeer mebKÙee peJeUheeme one keâesšer Deens. Ùee KešuÙeebÛee efveJeeCe keâjCÙeemee"er vÙeeÙee}Ùeerve keâecekeâepeele ieefleceevelee ÙesCes keâeUeÛeer iejpe Deens. µ vÙeeÙee}ÙeeJejer} Jee{lÙee KešuÙeebÛee oeye keâceer keâjCÙeemee"er keâesCeleer Keyejoejer IesCes DeeJeçÙekeâ Deens? - ne efJe µ mejkeâejves pej Ùee ceefnvÙeeÛÙee çesJešer ne veJeerve DeejeKe[e cebpetj kesâ}e lej vÙeeÙee}ÙeebJej leeCe he[Ceej veener keâe? - vÙeeÙee}ÙeeJej leeCe he[Ceej ner JemlegefmLeleer Deens. cee$e vÙeeÙee}Ùe ns vÙeeÙe osCÙeemee"er Deens. KešuÙeebÛee efveJee[e keâjCÙeemee"er Deens. DeeJeçÙekeâ leer meeOevemeece«eer DeeefCe ceveg<ÙeyeU> vÙeeÙee}Ùee}e Ghe}yOe Pee}s lej keWâõ mejkeâejÛÙee Ùee veJeerve efveCe&ÙeeÛee keâesCeleener heefjCeece keâecekeâepeeJej nesCeej veener.
व्यभिचारी पत्नीला कंटाळून, पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
http://beta.esakal.com/2009/07/17232240/vidarbha-janephal-murder-amp.html
सदर घटनेत पत्नीच्या व्याभिचाराला कंटाळून पतीने, त्याच्या पत्नीची हत्या केली, व नंतर स्वतः आत्महत्याकेली.
सकाळने नेहमीप्रमाणे पत्नीची बाजू घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
भारतीय कायदे असे आहेत, कि पत्नीने व्यभिचार केला तरी तिला सरळ शिक्षा देता येत नाही. पुरुषाला मात्र देतायेते. ह्याचा अर्थ काय ? स्त्रियांनी व्यभिचार केला तरी चालेल. किती थोर हे कायदे. एखाद्या पत्नीने व्यभिचारकेला, तर पती फक्त घटस्फोटासाठी अर्ज करू शकतो. त्यापलीकडे कायदा त्याला काही मदत करू शकत नाही. व्यभिचार कोर्टात सिद्ध करणे म्हणजे महाकठीण काम, सामान्य माणसाला जवळपास अशक्य. त्यामुळे सरळमार्गीमाणूस निराश होणे क्रमप्राप्त आहे. त्यातूनच ह्या असल्या घटना घडतात. सरकारने खरेतर लिंगाधारित कायदे रद्दकेले पाहिजेत.
Tuesday, July 14, 2009
पत्नीच्या कायदेशीर जाचाला कंटाळून, पतीकडून पत्नीची सुपारी
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/4774264.cms
विशेष बाब म्हणजे, मृत पत्नीने, तिच्या पतीवर पाच खटले दाखल केले होते, व त्यामुळं पतीला जगणे अशक्य झाले होते.
स्त्रीधार्जीने भारतीय कायदे हे खरेतर असल्या गुन्ह्यांचे मूळ कारण आहे. हे कायदे पत्नीला पतीवर
कोणत्याही पुराव्याविना, कोणतेही आरोप करायला स्वांतत्र्य देतात, आणि त्याचा दुरुपयोग करून अनेक स्त्रिया आपल्या पतीवर अतिशय हीन व खालच्या पातळीवरचे खोटे-नाटे आरोप करतात.
बरे पतीने हे आरोप खोटे आहेत हे कोर्टात सिद्ध जरी केले, तरी असले धादांत खोटे आरोप केल्याबद्दल त्या पत्नीला कोर्ट काहीही करीत नाही. ह्या असल्या खोट्या केसेस मुळे अनेक तरुण निराशेच्या गर्तेत सापडले आहेत. त्यातील एखाद्याने सहनशक्तीचा अंत झाल्यावर असले कृत्य केले, तर नवल ते काय. मुळात एका घटस्फोटासाठी ५ केसेस जी न्यायव्यवस्था करायला देते, ती खरी दोषी आहे.
Sunday, July 12, 2009
Why and how false cases make it to trial
presuming the commission of the offence by the accused. It seems not many judges do so, else there won't be so many false casses still floating around.
The above remarks about judges not applying their mind, has been taken from several high court and Supreme Court judgements. In these cases Supreme Court and High Court have came down heavily on the trial courts.
Below is the extract
"this Court had observed that at the stage of framing the charge, the Court has to apply its mind to the question whether or not there is any ground for presuming the commission of the offence by the accused. As framing of charge affects a person liberty substantially, need for proper consideration of material warranting such order was emphasized."
Thursday, July 2, 2009
कोर्टाकडून स्वैराचारी स्त्रियांना (पत्नीला) उत्तेजन ??
होय हे खरे आहे, राजस्थान उच्च न्यायालयाने एका निकालात असे म्हटले आहे कि जर एका पत्नीला आपल्यापतीला सोडून प्रियकराकडे जायचे असेल, तर त्यात वावगे असे काहीच नाही. न्यायालयाचे असे म्हणणे आहे कि जर एख्याध्या पत्नीला परक्या पुरुषाबरोबर राहायचे असेल तर त्यात चुकीचे असे काहीच नाही.
ह्या सगळ्यामध्ये गोम अशी आहे कि जर त्या पतीला असल्या व्याभिचारी पत्नीपासून घटस्फोट हवा असेल, तरकायदा त्याला तो सहजासहजी मिळवू देत नाही. कुटुंब विषयक कायदे स्त्रियांच्या बाजूचे असल्यामुळे बहुतेक वेळा असल्या दुष्ट स्त्रिया, असल्या कायद्यांचा वापर करून त्यांच्या पतींकडून पैसे उकळतात. कायद्याच्या मते स्त्री कधीच व्यभिचार करीत नाही. तिच्यावर फक्त जबरदस्ती होते.
Sunday, June 28, 2009
तरुण स्त्रीयांना कायद्याचे संरक्षण, पण वृद्ध स्त्रियांना नाही
म्हणजे जरी एखाद्या तरुण सुनेने, आपल्या वृद्ध सासूला त्रास दिला तरी चालेल. का त्यांना असे वाटते कि तरुण पत्नी म्हणजे देवीचा अवतार आहे ? तरुण पत्नी साठी कायदे तरी कित्ती - ४९८अ, हुंडा विरोधी कायदा, डि.वी कायदा, १२५, इत्यादी.
आणि मातांसाठी काय कायदे आहेत ? बहुतेक काही नाही. हेच का स्त्रीमुक्ती संघटनांचे दळभद्री समानतेचे तत्व ? तुम्हीच विचार करा.
Saturday, June 27, 2009
स्त्रियांकडून आणखी एक क्षेत्र पादक्रांत
http://beta.esakal.com/2009/06/26220605/pune-women-patients-increasing.html
ह्या असल्या स्त्रिया माता म्हणून त्यांच्या मुलांचा कसा सांभाळ करणार, हा तर मोठाच प्रश्न आहे.
असल्या स्त्रियांनी मग त्यांना भारतीय कायद्याने नको ते कायदे करून दिलेल्या अधिकारांचा दुरूपयोग केला तरत्यात नवल ते काय.Tuesday, June 23, 2009
दोन महिन्यांच्या मुलीला अटकपूर्व जामीन
खरेतर वकिलांनी जामीन बरोबर केला, पोलिसांनी गुन्हा दाखल करताना २ महिन्यांच्या मुलीलासुधा गुन्हेगारांच्या पंक्तीत बसविले. आता बातमी सगळीकडे पसरली म्हणून पोलीस आता स्वःताच्या चुकांवर पांघरून घालत आहेत. जर त्या बाळाचा जामीन केला नसता तर बहुतेक त्या लहान बाळाला जेलची हवा खावी लागली असती.
ज्या मूर्खांनी ४९८अ सारखा कायदा बनविला, त्यामुळे हे सगळे प्रकार घडत आहेत.
Friday, June 12, 2009
लिंगभेदी भारतीय कायदे
जसे स्त्रिया पुरुषांशी चांगल्या बाबींमध्ये स्पर्धा करित्त आहेत, तसेच काही स्त्रिया पुरुषांशी गुन्हेगारी मध्येसुधा स्पर्धा करीत आहेत.
अनेक शहरी स्त्रिया आपला नवरा आपल्या मुठीत कसा राहील हेच बघत असतात. अशा स्त्रियांची काळजीघेण्यासाठी सरकारने अनेक कायदे केले आहेत. IPC ४९८अ हा ह्या सगळ्या कायद्यांमध्ये सर्वात पुढे आहे. ह्याकायद्याअन्वेय कुठलीही पत्नी पोलीस स्टेशन मध्ये, कुठल्याही पुराव्या शिवाय तिचे पती, सासू, सासरे, वपतीच्या कोणत्याही नातेवाईका विरुद्ध तक्रार करू शकते. आणि पोलीस त्या तक्रारीची दखल घेऊन, त्या स्त्रीने ज्यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे, त्या सर्वांना अटक करतात. (मी मुद्दाम करू शकतात असे लिहिले नाही, कारण पोलीस अटक करतातच)
Indian Gender Biased Laws
The so-called feminist (aka feminazis) are creating havoc in India. Most of these feminazis have had a troubled relationship and are mentally sick. They are very good in blowing out any event. Women empowerment is mistaken with harassing straightforward husbands. The sadistic pleasure taken in harassing husbands, is the feminazis ultimate goal.