Showing posts with label hindu marriage act. Show all posts
Showing posts with label hindu marriage act. Show all posts

Thursday, September 17, 2009

उशिराने आलेलं शहाणपण

नुकताच सकाळ मध्ये एक लेख वाचनात आला.

http://beta.esakal.com/Article/ArticlePage.aspx?Id=24A031AD-F40E-45E7-B61F-2054267AA199
त्यात एका घटस्फोटीत महिलेने स्वःताची चूक मान्य केली आहे. तिला तिच्या कृत्याचा आता पश्चाताप होतआहे. दुर्दैवाने पश्चाताप थोडा उशिरानेच झाला, पण देर आये दुरुस्त आये, सारखी परिस्थिती संसारात बहुतेकवेळा नसते. ह्याच्या पेक्षा वाईट पाळी खोट्या केसेस करणाऱ्या तरुणींवर येते, आणि येत राहणार आहे.

जरी लेखिकेने सगळं सांगितले नसेल, पण, कोर्टात तिच्या नवऱ्याला तिने फार त्रास दिला असेल हे निश्चित.
कोर्ट हे असल्या केसेस मध्ये नेहमी पत्नीच्या बाजूने पक्षपात करतात. हिंदू विवाह कायदा त्यांना तसे करायलाउत्तेजन देतो. हा कायदा अस्तित्वात आला आहे १९५५ मध्ये, आणि त्याला बदललेल्या सामाजिक परीस्थितेचेभान नाही आहे. कायदा अजून तरुण पत्नीला अबला समजतो, आणि तिच्या बाजूने पक्षपात करतो. मग तिचीबाजू कितीही लंगडी असली तरी. हा कायदा असल्या हेकेखोर पत्नींना आणखी उत्तेजन देतो, जेणेकरून त्याआपल्या पतीला असह्य असा मानसिक त्रास देतात. मुलांचा ताबा नेहमी पत्नीकडे जातो. जर तिने नकार दिलातरच पतीकडे जातो.
असो एका महिलेला तरी धडा मिळाला हेही नसे थोडके. :-)

Thursday, August 27, 2009

पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याने पत्नीसह तिघांना सक्तमजुरी

नव विवाहित तरुण पत्नीच्या जाचामुळे जरी हजारो तरुण आत्महत्या करीत असले, तरी आपला समाज झोपलेलाच आहे. असली आत्महत्येची प्रकरणे दाबून टाकण्यात येतात. पण एका दिलासादायक घटनेत, महाराष्ट्रातील एका न्यायालयाने असल्या प्रकरणात पत्नीच्या जाचामुळे आत्महत्या केलेल्या तरुणाच्या पत्नी, सासरा, तिचा प्रियकर अश्या तिघांना वर्षे सक्तमजुरीची शिक्षा फर्मावली आहे. जरी शिक्षा कमी वाटत असली, तरी न्यायालयाने त्यांना शिक्षा केली हे एक चांगले पाऊल आहे.

ह्याही प्रकरणात बाहेरख्याली पत्नीने आपला अपराध लपविण्यासाठी उलट पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती.


http://beta.esakal.com/2009/08/27000830/pune-husband-suicide.html


पुणे - पतीचा मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या एका दुर्मिळ खटल्यात न्यायालयाने त्याच्या पत्नीसह, तिचे वडील आणि प्रियकराला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. पी. वाईकर यांच्यासमोर खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. विक्रम नारायण कांबळे (रा. कळस) याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपात न्यायालयाने त्याची पत्नी स्नेहलता ऊर्फ पिंकी विक्रम कांबळे, सासरे अशोक भीमराव कांबळे आणि रितेश गयाल (तिघे रा. संगमवाडी, खडकी) यांना दोषी ठरविले. विक्रम यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती. या तिघांमुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी विक्रम यांच्या खिशातून पोलिसांना मिळाली होती. ही चिठ्ठी आरोपींना दोषी ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली. चिठ्ठीतील हस्ताक्षर विक्रम यांचे असल्याचे तज्ज्ञांच्या अहवालातून स्पष्ट झाले होते. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील एम. डी. पिसाळ यांनी नऊ साक्षीदार तपासले.
विक्रम आणि स्नेहलता यांचा ता. 19 फेब्रुवारी 2006 रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर ती कोल्हापूर येथून दोन-तीन आठवड्यांत पुन्हा पुण्यात परत आली. तिने विक्रमला पुण्यात स्थायिक होण्याचा आग्रह धरला. त्यामुळे विक्रम हा कळस येथे येऊन राहू लागला. तो वाहनचालकाची नोकरी करीत होता. दरम्यान, स्नेहलता आणि रितेश यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे विक्रमने सासरे अशोक कांबळे यांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतरही त्यांच्या वर्तनात बदल झाला नाही. उलट आरोपींनी विक्रम आणि त्याच्या घरातील लोकांविरुद्ध पोलिसांकडे छळाची तक्रार केली. पोटगीसाठी दावा दाखल केला. हा मानसिक छळ सहन झाल्याने विक्रमने आत्महत्या केली, अशी तक्रार त्यांचे भाऊ नारायण कांबळे यांनी दिली होती.