पुणे येथील एका महिलेची, तिच्या पतीने सुपारी देउन हत्या केल्याचा आरोप आहे.
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/4774264.cms
विशेष बाब म्हणजे, मृत पत्नीने, तिच्या पतीवर पाच खटले दाखल केले होते, व त्यामुळं पतीला जगणे अशक्य झाले होते.
स्त्रीधार्जीने भारतीय कायदे हे खरेतर असल्या गुन्ह्यांचे मूळ कारण आहे. हे कायदे पत्नीला पतीवर
कोणत्याही पुराव्याविना, कोणतेही आरोप करायला स्वांतत्र्य देतात, आणि त्याचा दुरुपयोग करून अनेक स्त्रिया आपल्या पतीवर अतिशय हीन व खालच्या पातळीवरचे खोटे-नाटे आरोप करतात.
बरे पतीने हे आरोप खोटे आहेत हे कोर्टात सिद्ध जरी केले, तरी असले धादांत खोटे आरोप केल्याबद्दल त्या पत्नीला कोर्ट काहीही करीत नाही. ह्या असल्या खोट्या केसेस मुळे अनेक तरुण निराशेच्या गर्तेत सापडले आहेत. त्यातील एखाद्याने सहनशक्तीचा अंत झाल्यावर असले कृत्य केले, तर नवल ते काय. मुळात एका घटस्फोटासाठी ५ केसेस जी न्यायव्यवस्था करायला देते, ती खरी दोषी आहे.
Showing posts with label indian laws misused by women. Show all posts
Showing posts with label indian laws misused by women. Show all posts
Tuesday, July 14, 2009
Sunday, June 28, 2009
तरुण स्त्रीयांना कायद्याचे संरक्षण, पण वृद्ध स्त्रियांना नाही
भारतीय कायद्याच्या मते स्त्री म्हणजे फक्त तरुण बायको. कायद्याची स्त्रियांबद्दल संकुचित व्याख्या का ? बहिणी , वयोवृद्ध आई, ह्या स्त्रिया नव्हेत काय ? ह्यांच्या साठी भारतीय कायद्या मध्ये फार तरतुदी नाहीत. स्त्री हि अनंत कालची माता असते असे म्हणतात. पण भारतीय कायदे पंडितांना मात्र तसे वाटत नाही. त्यांच्या मते स्त्रीची अनेक रूपे असली तरी तरुण पत्नी हे त्यातील सर्वात महत्वपूर्ण रूप आहे.
म्हणजे जरी एखाद्या तरुण सुनेने, आपल्या वृद्ध सासूला त्रास दिला तरी चालेल. का त्यांना असे वाटते कि तरुण पत्नी म्हणजे देवीचा अवतार आहे ? तरुण पत्नी साठी कायदे तरी कित्ती - ४९८अ, हुंडा विरोधी कायदा, डि.वी कायदा, १२५, इत्यादी.
आणि मातांसाठी काय कायदे आहेत ? बहुतेक काही नाही. हेच का स्त्रीमुक्ती संघटनांचे दळभद्री समानतेचे तत्व ? तुम्हीच विचार करा.

Subscribe to:
Posts (Atom)