Tuesday, July 14, 2009

पत्नीच्या कायदेशीर जाचाला कंटाळून, पतीकडून पत्नीची सुपारी

पुणे येथील एका महिलेची, तिच्या पतीने सुपारी देउन हत्या केल्याचा आरोप आहे.

http://timesofindia.indiatimes.com/articleshow/4774264.cms

विशेष बाब म्हणजे, मृत पत्नीने, तिच्या पतीवर पाच खटले दाखल केले होते, त्यामुळं पतीला जगणे अशक्य झाले होते.

स्त्रीधार्जीने भारतीय कायदे हे खरेतर असल्या गुन्ह्यांचे मूळ कारण आहे. हे कायदे पत्नीला पतीवर
कोणत्याही पुराव्याविना, कोणतेही आरोप करायला स्वांतत्र्य देतात, आणि त्याचा दुरुपयोग करून अनेक स्त्रिया आपल्या पतीवर अतिशय हीन खालच्या पातळीवरचे खोटे-नाटे आरोप करतात.

बरे पतीने हे आरोप खोटे आहेत हे कोर्टात सिद्ध जरी केले, तरी असले धादांत खोटे आरोप केल्याबद्दल त्या पत्नीला कोर्ट काहीही करीत नाही. ह्या असल्या खोट्या केसेस मुळे अनेक तरुण निराशेच्या गर्तेत सापडले आहेत. त्यातील एखाद्याने सहनशक्तीचा अंत झाल्यावर असले कृत्य केले, तर नवल ते काय. मुळात एका घटस्फोटासाठी केसेस जी न्यायव्यवस्था करायला देते, ती खरी दोषी आहे.

1 comment:

  1. http://india.smetoolkit.org/india/en/content/en/38633/Perjury-and-the-Indian-Legal-System

    Perjury and the Indian Legal System

    ReplyDelete