Thursday, July 2, 2009

कोर्टाकडून स्वैराचारी स्त्रियांना (पत्नीला) उत्तेजन ??

http://www.rediff.com/news/2007/apr/19wife.htm

होय हे खरे आहे, राजस्थान उच्च न्यायालयाने एका निकालात असे म्हटले आहे कि जर एका पत्नीला आपल्यापतीला सोडून प्रियकराकडे जायचे असेल, तर त्यात वावगे असे काहीच नाही. न्यायालयाचे असे म्हणणे आहे कि जर एख्याध्या पत्नीला परक्या पुरुषाबरोबर राहायचे असेल तर त्यात चुकीचे असे काहीच नाही.

ह्या सगळ्यामध्ये गोम अशी आहे कि जर त्या पतीला असल्या व्याभिचारी पत्नीपासून घटस्फोट हवा असेल, तरकायदा त्याला तो सहजासहजी मिळवू देत नाही. कुटुंब विषयक कायदे स्त्रियांच्या बाजूचे असल्यामुळे बहुतेक वेळा असल्या दुष्ट स्त्रिया, असल्या कायद्यांचा वापर करून त्यांच्या पतींकडून पैसे उकळतात. कायद्याच्या मते स्त्री कधीच व्यभिचार करीत नाही. तिच्यावर फक्त जबरदस्ती होते.

No comments:

Post a Comment