भारतीय कायद्याच्या मते स्त्री म्हणजे फक्त तरुण बायको. कायद्याची स्त्रियांबद्दल संकुचित व्याख्या का ? बहिणी , वयोवृद्ध आई, ह्या स्त्रिया नव्हेत काय ? ह्यांच्या साठी भारतीय कायद्या मध्ये फार तरतुदी नाहीत. स्त्री हि अनंत कालची माता असते असे म्हणतात. पण भारतीय कायदे पंडितांना मात्र तसे वाटत नाही. त्यांच्या मते स्त्रीची अनेक रूपे असली तरी तरुण पत्नी हे त्यातील सर्वात महत्वपूर्ण रूप आहे.
म्हणजे जरी एखाद्या तरुण सुनेने, आपल्या वृद्ध सासूला त्रास दिला तरी चालेल. का त्यांना असे वाटते कि तरुण पत्नी म्हणजे देवीचा अवतार आहे ? तरुण पत्नी साठी कायदे तरी कित्ती - ४९८अ, हुंडा विरोधी कायदा, डि.वी कायदा, १२५, इत्यादी.
आणि मातांसाठी काय कायदे आहेत ? बहुतेक काही नाही. हेच का स्त्रीमुक्ती संघटनांचे दळभद्री समानतेचे तत्व ? तुम्हीच विचार करा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment