नव विवाहित तरुण पत्नीच्या जाचामुळे जरी हजारो तरुण आत्महत्या करीत असले, तरी आपला समाज झोपलेलाच आहे. असली आत्महत्येची प्रकरणे दाबून टाकण्यात येतात. पण एका दिलासादायक घटनेत, महाराष्ट्रातील एका न्यायालयाने असल्या प्रकरणात पत्नीच्या जाचामुळे आत्महत्या केलेल्या तरुणाच्या पत्नी, सासरा, व तिचा प्रियकर अश्या तिघांना ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा फर्मावली आहे. जरी शिक्षा कमी वाटत असली, तरी न्यायालयाने त्यांना शिक्षा केली हे एक चांगले पाऊल आहे.
ह्याही प्रकरणात बाहेरख्याली पत्नीने आपला अपराध लपविण्यासाठी उलट पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती.
http://beta.esakal.com/2009/08/27000830/pune-husband-suicide.html
पुणे - पतीचा मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या एका दुर्मिळ खटल्यात न्यायालयाने त्याच्या पत्नीसह, तिचे वडील आणि प्रियकराला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. पी. वाईकर यांच्यासमोर खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. विक्रम नारायण कांबळे (रा. कळस) याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपात न्यायालयाने त्याची पत्नी स्नेहलता ऊर्फ पिंकी विक्रम कांबळे, सासरे अशोक भीमराव कांबळे आणि रितेश गयाल (तिघे रा. संगमवाडी, खडकी) यांना दोषी ठरविले. विक्रम यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती. या तिघांमुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी विक्रम यांच्या खिशातून पोलिसांना मिळाली होती. ही चिठ्ठी आरोपींना दोषी ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली. चिठ्ठीतील हस्ताक्षर विक्रम यांचे असल्याचे तज्ज्ञांच्या अहवालातून स्पष्ट झाले होते. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील एम. डी. पिसाळ यांनी नऊ साक्षीदार तपासले.
विक्रम आणि स्नेहलता यांचा ता. 19 फेब्रुवारी 2006 रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर ती कोल्हापूर येथून दोन-तीन आठवड्यांत पुन्हा पुण्यात परत आली. तिने विक्रमला पुण्यात स्थायिक होण्याचा आग्रह धरला. त्यामुळे विक्रम हा कळस येथे येऊन राहू लागला. तो वाहनचालकाची नोकरी करीत होता. दरम्यान, स्नेहलता आणि रितेश यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे विक्रमने सासरे अशोक कांबळे यांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतरही त्यांच्या वर्तनात बदल झाला नाही. उलट आरोपींनी विक्रम आणि त्याच्या घरातील लोकांविरुद्ध पोलिसांकडे छळाची तक्रार केली. पोटगीसाठी दावा दाखल केला. हा मानसिक छळ सहन न झाल्याने विक्रमने आत्महत्या केली, अशी तक्रार त्यांचे भाऊ नारायण कांबळे यांनी दिली होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment