Sunday, August 16, 2009

हैदराबाद पोलिसांचे ४९८अ बद्दल प्रशंसनीय पाऊल

नुकतेच माझ्या वाचनात हैदराबाद पोलिसांची वेबसाईत आली. ४९८अ चा गैरवापर रोखण्यासाठी त्यात स्त्रीयांना अनेक नियम सांगितले आहेत. http://www.hyderabadpolice.gov.in/WomenCorner/498A.htm
त्या नियमांचा स्वैर अनुवाद येथे दिला आहे. आशा करूया कि महाराष्ट्र पोलीस पण ह्यातून काही बोध घेतील.

१.) नेहमी लक्षात ठेवा पती पत्नी आणि मुलांनी आपसात चर्चा करावी, ती कौन्सेलिंगपेक्षा जास्त चांगली.
२.) माणसांकडून चुका होतातच. चुका दोन्ही बाजूनी होतात. आपल्या चुका लपविण्यासाठी कायद्याचा दुरुपयोग करू नये.
३.) पोलिसांकडे येण्यागोदर कौन्सेलिंग करावे.
४.) अतिरंजित करून काहीही सांगू नये. जे घडले आहे, ते स्पष्ट, व नेमकेपणाने सांगणे.
५.) ज्या माणसांचा सहभाग नाही, त्यांची उगाच नावे घेऊन त्याना विनाकारण गुंतवू नये.
६.) निट लक्षात ठेवा ४९८अ हा कायदा बदला घेण्यासाठी नाही आहे, तर ज्यांनी गुन्हा केला आहे, त्यांना शिक्षा देण्यासाठी आहे.
७.) तुमचा गैरफायदा घेणारे बरेच महाभाग असतात. ते तुम्हाला घटना अतिरंजित करून सांगायला प्रवृत्त करतील, तसेच ज्यांचा सहभाग नाही आहे अश्यांची नावे घ्यायला सांगतील, हुंडा मध्ये जास्त पैसे दिल्याचे सांगायला सांगतील, इत्यादी.
८.) जर तुम्हाला मदत हवी असेल, तर मान्यवर स्वयंसेवी संघटना, किंवा हेल्पलाईनशी संपर्क करणे. उगाच असल्या महाभागांकडे जाऊ नये, जे तुम्हाला पैसे उकलण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देतील.
९.) तक्रार करताना स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर रहा, व आपली तक्रार नीट वाचून घेणे.
१०.) बऱ्याच वेळा तक्रार कर्ते आपली केस मजबूत करण्यासाठी अतिरंजित व काल्पनिक आरोप करतात. कुठलीही केस मजबूत होण्यासाठी ठोस पुराव्यांची आवशकता असते. जर पुरावे नसतील, आणि फक्त बेछुट आरोप असतील, तर केस फार कमकुवत होते, आणि निरपराध व्यक्तींना त्रास होतो.
११.) जर कोणी पोलीस किंवा संबंधित अधिकारी पैसे मागत असेल, तर देऊ नये, व त्याच्या वरिष्ठ अधिकार्याकडे तक्रार करावी.
१२.) लक्षात ठेवा आपल्या नवऱ्याला, घटस्फोट मिळण्यासाठी ४९८अ चा गैरवापर करू नये. घटस्फोट मिळण्यासाठी इतर कायदे आहेत, त्यांचा आधार घ्यावा.
१३.) लक्षात ठेवा, ४९८अ आपल्या मुलांचा ताबा मिळविण्यासाठी नाही आहे. त्यासाठी वेगळे कायदे आहेत.
१४.) ज्या दिवशी तक्रार केली जाईल, त्याच दिवशी पोलिसांवर अटक करण्यासाठी दबाव टाकू नये. पुरावा गोळा करण्यासाठी वेळ लागतो. जर तुम्हाला पोलीसांना मदत करायचीच असेल तर, त्यांना पुरावे देणे.
१५.) संपूर्ण देशात ४९८अ मध्ये फार कमी प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध होतो. त्याची अनेक कारणे आहेत. पुराव्याशिवाय नुसते बेछुट व अतिरंजित आरोप करणे, खटला चालू असताना जबाब बदलणे, इत्यादी.

No comments:

Post a Comment