Thursday, August 27, 2009

एका मातेचा उद्वेग

सकाळ मध्ये एका आईची करुण कथा. कसे तिच्या मुलाला तिच्या सुनेने त्रास दिला

http://beta.esakal.com/2009/08/24194806/Mukapeeth-on-engagement.html

भरला संसार तिने केवळ आपला "इगो' सांभाळण्यासाठी मोडला आहे. मुलांना त्यांच्या बाबांपासून दूर करायचा हिला काय अधिकार आहे? संसाराची धूळधाण आम्हाला आता या वयात बघवत नाही.
आजकाल समाजात जी विषवल्ली झपाट्याने पसरली आहे, त्या विषवल्लीचा कसा नायनाट करावा या विचारानेच माझी मती मठ्ठ झाली आहे. संसार मांडताना- तो वाढविताना- तो जपताना सर्व गोष्टींत स्त्रीचा फार मोठा भाग असतो. मुलांवर संस्कार करण्यात, त्यांना घडविण्यात आईचा मोठा वाटा असतो. तिची ती फार मोठी जबाबदारी असते. पण आज पाहिले तर संस्कार करण्यात आईवडील कमी पडतात, की समाजातील घटकांचा परिणाम लहान वयापासून मुलामुलींवर होत आहे? पण उद्‌ध्वस्त होणारे संसार हे त्याचे कटुसत्य आहे. माझ्या मुलाच्या आयुष्याचेपण तिने असेच वाटोळे केले आहे.
दहा वर्षांपूर्वी आमच्या मुलाचा अवघ्या २४ व्या वर्षी प्रेमविवाह झाला (?). लग्नाअगोदरपासून तो परदेशात आहे. लग्नानंतर अवघ्या आठ दिवसांत ते दोघे तिकडे गेले. पहिले नवलाईचे दिवस संपेपर्यंत ती आमच्या तिघांशी ठीक वागत होती. पण तिचा खरा स्वभाव, तिचे खरे रूप नंतरच समोर यायला लागले. तिच्या दुसऱ्यावर हुकमत करायच्या स्वभावाकडे आमच्या मुलाने फारसे लक्ष न देता खतपाणी घातले, असे आज वाटते. आपल्या मनाविरुद्ध घडत आहे. म्हणजेच नवरा आपल्या मनासारखे वागत नाही म्हटल्यावर तिने त्याला खूप मानसिक त्रास द्यायला सुरवात केली. इतकी वर्षे तिचे ऐकत राहून शेवटी त्याचीपण सहनशक्ती संपली व आपल्यालाही मन आहे, मत आहे याची त्याला खरी जाणीव झाली आणि तिथेच सर्व बिनसले. लहानपणापासूनच अतिशय लाडात वाढलेली, वोळपरींश पर्रीीींश, दुसऱ्याबद्दल सतत संशय, फिल्मी वागणे, खोटे बोलणे, हट्टी-दुराग्रही अशा स्वभावामुळे मुलालापण तिच्याबरोबर संसार करण्याचा कंटाळा आला. तो या सर्व गोष्टी सहन करू शकत नव्हता. तिच्या आईचा स्वभाव असाच असल्यामुळे त्यांच्या घरातील वातावरणही विचित्रच आहे. त्याचा सर्व परिणाम तिच्यावर झाला आहे. आईने योग्य संस्कार न केल्यामुळे आज त्यांचा संसार उद्‌ध्वस्त झाला आहे.
खरे तर लग्नानंतर दोघेच राहत होते. त्यांच्या संसारात आम्ही दोघे नव्हतो. मुलाबरोबर ती सर्व जग फिरली आहे. सोन्यासारखा आठ वर्षांचा मुलगा आहे आणि मनासारखी मुलगी आहे. इतके सर्व सुख मागूनही मिळणार नाही असे आहे. आम्हाला मुलगी नसल्यामुळे आम्ही मुलगी समजून तिचे खूप लाड केले. पण अतिशय सुखामुळे की काय (सुख बोचणे म्हणतात तसे) तिने मागच्या वर्षी घर सोडले; स्वतःच्या दोन लहान मुलांना घेऊन! मुलगी िीश ार्रीींरीव असल्यामुळे आमच्या मुलाला मुलांची अतिशय काळजी वाटते. पण ही केवळ स्वतःच्या अहंकारापायी कसलाही विचार न करता घरातून निघून गेली आहे. यात लहान मुलांचा काय अपराध आहे? त्यांना त्यांच्या वडिलांना ती भेटू देत नाहीये! तिचे आईवडील याबद्दल काहीच बोलत नाहीत. आणि आम्ही भेटायला गेलो तर आमचा अपमानच केला. आमचा मुलगा भावनाप्रधान आहे, तर ती अतिशय िीरलींळलरश्र आहे. त्यामुळे या सर्वांचा मुलाच्या मनावर खूपच परिणाम झाला आहे. सर्वांनाच मनस्ताप झाला आहे.
भरला संसार तिने केवळ आपला "इगो' सांभाळण्यासाठी मोडला आहे. मुलांना त्यांच्या बाबांपासून दूर करायचा हिला काय अधिकार आहे? संसाराची धूळधाण आम्हाला आता या वयात बघवत नाहीये. आज मुलींच्या बाजूने न्यायालय बोलते. पण एका अभागी मुलाची दुर्दैवी आई विचारत आहे, की आमचे काय चुकले? जे आईवडील आपल्या मुलीला अशा प्रकारे साह्य करतात, पाठीशी घालतात, त्यांच्या लक्षात येत नाही का, की आपण आपल्याच मुलीच्या संसाराच्या नाशाला कारणीभूत आहोत! मुलगी जर तुम्हाला तिच्या भानगडीत पडू देत नाही, असे असेल तर निदान तिच्या वागण्याला प्रोत्साहन तरी देऊ नका! आईमुळे मुलांनापण भोगायला लागते आहे. यातून काही मार्ग तर सापडत नाहीये! आमच्यासारखी जगात भरपूर उदाहरणे असतील; पण तिला कसे समजवावे? मुलाला घटस्फोट घ्यायचा नाहीये; तर ती काहीच बोलायला तयार नाही. यातून काही मार्ग निघेल का? माझा प्रत्येक दिवस आसवांत वाहून जात आहे! एकुलत्या एक मुलाचे दुःख पाहवत नाही आणि मार्गही सापडत नाही, काय करू?
सौ. रंजना कुलकर्णी

1 comment:

  1. अगदी हुबेहुब हीच परिस्थिती माझी सुद्धा आहे
    लग्नाला 5 वर्षे झाली 1 वर्ष चा मुलगा आहे ती सतत माहेरी जाते तिचे आई वडील तिला प्रोत्साहन देत असतात मी घरातील लहान मुलगा असल्याने माझे वडील 72 वर्ष व आई 61 वर्ष वया चे आहेत माझी जबाबदारी आहेत ते दोघं 4 वर्ष पासून मला घर असून पत्नी च्या हट्ट मुळे भाड्याच्या घरात रहावं लागत आहे आई वडील यांना एकटा सोडून आता मला सहन होत नाही आहे तर ती घटास्पोट द्यायला म्हणत आहे

    ReplyDelete