Sunday, June 28, 2009

तरुण स्त्रीयांना कायद्याचे संरक्षण, पण वृद्ध स्त्रियांना नाही

भारतीय कायद्याच्या मते स्त्री म्हणजे फक्त तरुण बायको. कायद्याची स्त्रियांबद्दल संकुचित व्याख्या का ? बहिणी , वयोवृद्ध आई, ह्या स्त्रिया नव्हेत काय ? ह्यांच्या साठी भारतीय कायद्या मध्ये फार तरतुदी नाहीत. स्त्री हि अनंत कालची माता असते असे म्हणतात. पण भारतीय कायदे पंडितांना मात्र तसे वाटत नाही. त्यांच्या मते स्त्रीची अनेक रूपे असली तरी तरुण पत्नी हे त्यातील सर्वात महत्वपूर्ण रूप आहे.

म्हणजे जरी एखाद्या तरुण सुनेने, आपल्या वृद्ध सासूला त्रास दिला तरी चालेल. का त्यांना असे वाटते कि तरुण पत्नी म्हणजे देवीचा अवतार आहे ? तरुण पत्नी साठी कायदे तरी कित्ती - ४९८अ, हुंडा विरोधी कायदा, डि.वी कायदा, १२५, इत्यादी.

आणि मातांसाठी काय कायदे आहेत ? बहुतेक काही नाही. हेच का स्त्रीमुक्ती संघटनांचे दळभद्री समानतेचे तत्व ? तुम्हीच विचार करा.

Saturday, June 27, 2009

स्त्रियांकडून आणखी एक क्षेत्र पादक्रांत

दारूचे व्यसन हे भारतात आजपर्यंत पुरुषांची मक्तेदारी आहे असा सर्वसामान्य "गैर" समज होता. पण स्त्रियाही त्यात मागे नाहीत. कोणत्याही ओल्या पार्टी मध्ये जा. तिथे स्त्रियाहि पुरुषांच्या बरोबरीने यथेच्य मद्यपान करीत असतात. पण ह्या उघड "गुपित" बद्दल जास्त कोणी बोलत नव्हते. पण आता परिस्थिती फारच हाताबाहेर जाउ लागल्यावर ह्या तथाकथित पुढारलेल्या महिलांना व्यसनमुक्तीसाठी उपचार घ्यावे लागत आहेत.

http://beta.esakal.com/2009/06/26220605/pune-women-patients-increasing.html

ह्या असल्या स्त्रिया माता म्हणून त्यांच्या मुलांचा कसा सांभाळ करणार, हा तर मोठाच प्रश्न आहे.

असल्या स्त्रियांनी मग त्यांना भारतीय कायद्याने नको ते कायदे करून दिलेल्या अधिकारांचा दुरूपयोग केला तरत्यात नवल ते काय.

Tuesday, June 23, 2009

दोन महिन्यांच्या मुलीला अटकपूर्व जामीन

http://beta.esakal.com/2009/06/22234321/maharashtra-2-years-baby-case.html

खरेतर वकिलांनी जामीन बरोबर केला, पोलिसांनी गुन्हा दाखल करताना महिन्यांच्या मुलीलासुधा गुन्हेगारांच्या पंक्तीत बसविले. आता बातमी सगळीकडे पसरली म्हणून पोलीस आता स्वःताच्या चुकांवर पांघरून घालत आहेत. जर त्या बाळाचा जामीन केला नसता तर बहुतेक त्या लहान बाळाला जेलची हवा खावी लागली असती.

ज्या मूर्खांनी ४९८अ सारखा कायदा बनविला, त्यामुळे हे सगळे प्रकार घडत आहेत.

Friday, June 12, 2009

लिंगभेदी भारतीय कायदे

भारतीय कायदे असे मानून चालतात कि स्त्री हि अबला नारी आहे, आणि तिला संरक्षणाची गरज आहे. पूर्वीच्याकाळी हे सर्व ठीक होते. पण सध्याचे युग हे स्त्री पुरूष समानतेचे युग आहे. काळ बदलला आहे. सध्या स्त्रिया अनेक क्षेत्रात पुरुषांशी बरोबरी करीत आहेत, आणि हि चांगली गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो किपुरुष स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे.

जसे स्त्रिया पुरुषांशी चांगल्या बाबींमध्ये स्पर्धा करित्त आहेत, तसेच काही स्त्रिया पुरुषांशी गुन्हेगारी मध्येसुधा स्पर्धा करीत आहेत.

अनेक शहरी स्त्रिया आपला नवरा आपल्या मुठीत कसा राहील हेच बघत असतात. अशा स्त्रियांची काळजीघेण्यासाठी सरकारने अनेक कायदे केले आहेत. IPC ४९८अ हा ह्या सगळ्या कायद्यांमध्ये सर्वात पुढे आहे. ह्याकायद्याअन्वेय कुठलीही पत्नी पोलीस स्टेशन मध्ये, कुठल्याही पुराव्या शिवाय तिचे पती, सासू, सासरे, पतीच्या कोणत्याही नातेवाईका विरुद्ध तक्रार करू शकते. आणि पोलीस त्या तक्रारीची दखल घेऊन, त्या स्त्रीने ज्यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे, त्या सर्वांना अटक करतात. (मी मुद्दाम करू शकतात असे लिहिले नाही, कारण पोलीस अटक करतातच)

Indian Gender Biased Laws

I am starting this blog to draw attention to a growing menace, lop-sided gender biased laws in India. These laws are like a blot on the Indian society as a whole. On a worrisome note, more such new laws are being created. This will create mess in the Indian society. Leading the charge is 498A.

The so-called feminist (aka feminazis) are creating havoc in India. Most of these feminazis have had a troubled relationship and are mentally sick. They are very good in blowing out any event. Women empowerment is mistaken with harassing straightforward husbands. The sadistic pleasure taken in harassing husbands, is the feminazis ultimate goal.