टायगर वूड्स, म्हणजे क्रीडाविश्वातील एक आश्चर्य. एक असामान्य प्रतिभेचा खेळाडू, खऱ्या अर्थाने जीनियस. पण बिचारा, व्यक्तिगत कारणांमुळे त्याने गोल्फ पासून संन्यास घेतला आहे. त्याच्या ह्या निर्णयाने, जग एका अचाट क्षमतेच्या खेळाडूला मुकला आहे. त्याच्या ह्या निर्णयामागे एक महत्वाचे कारण आहे, आणि ते म्हणजे त्याची पत्नी. त्याचे आणि त्याच्या पत्नीचे कसल्यातरी कारणावरून बिनसले, आणि तिने टायगर वूड्सला मारहाण सुद्धा केली. अमेरिकेत विवाह्संबंधी कायदे भारतापेक्षा बरे आहेत. तर तिथे हि कथा, मग भारतात जिथे पत्नीला, कायद्याने अतिशय भयानक अस्त्र प्रदान केली आहेत, तिथे एखादी पत्नी काय करू शकते, ह्याचा जरा विचार करा. जर टायगर वूड्स, भारतीय नागरिक असता, तर त्याला त्याच्या पत्नीने एव्हाना जेलची हवा खायला पाठविले असते. समंजस अमेरिकन कायद्यांमुळे तो वाचला. आज अनेक भारतीय तरुण, असेच आपला व्यवसाय, व नोकरी सोडून, घरी बसले आहेत. त्यांचे सारे बळ, त्यांच्या पत्नीने त्यांच्या विरुद्ध केलेल्या ४९८अ, व इतर खोट्या केसेस लढण्यात वाया जात आहे. आपल्या देशातील मूर्ख कायद्यांमुळे, देशातील अनेक तरुणांची क्रयशक्ती वाया जात आहे. हे तरुण निराशेच्या गर्तेत सापडले आहेत, ते वेगळेच. आज ह्या असल्या खोट्या केसेसमुळे भारतात दरवर्षी ४,५०० कोटी रुपयांचा चुराडा होत आहे. जो पैसा देशाच्या विकासावर खर्च केला गेला पाहिजे, तो अक्षरशः वाया जात आहे. ह्या सगळ्याचे मूळ आहे, ४९८अ, हिंदू विवाह कायदा, घरगुती हिंसाचार कायदा, पोटगी साठी पत्नीच्या बाजूने उघडपणे दिले जाणारे पक्षपाती निर्णय , हे आहे . भारतीय कायदे, पत्नीच्या बाजूने फारच पक्षपाती आहेत, जे न्यायला धरून अजिबात नाही आहे.
जो देश तरुणांना असल्या प्रकारची वागणूक देतो, त्याने महासत्तेची स्वप्ने कदापि बघू नयेत. जिथे, टायगर वूड्स सारख्यावर, हि नामुष्की, तर लाखो भारतीय तरुण, हा अन्याय कसे झेलत आहेत, त्याची कल्पना करा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment