कोलकाता येथे राहणाऱ्या, हिरेन सरकार, वय, ३८ वर्षीय, ह्याने, आत्महत्या केली. मृत्युपूर्वी लिहिलेल्या पत्रात त्याने, त्याच्या पत्नीने केलेल्या खोट्या पोलीस केस मुळे, त्रस्त होऊन आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. त्याची पत्नी महुआ हिने, ६ जून २००९ साली, त्याच्या विरुद्ध ४९८अ अन्वये, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती.
हीच आत्महत्या, जर एका पत्नीने केली असती, तर टीव्ही चेनेल वर दिवस रात्र हि बातमी दिसली असती.
http://www.telegraphindia.com/1090827/jsp/calcutta/story_11414324.jsp
Sunday, January 10, 2010
Saturday, January 9, 2010
रुचिका गिऱ्होत्रा प्रकरण आणि भारतीय कायदे
सध्या रुचिका गिऱ्होत्रा ह्या तरुणीने केलेली आत्महत्या, हा विषय फारच चर्चिला जात आहे. हे प्रकरण काय आहे ते पाहूया.
हरयाणाचे माजी पोलीस महासंचालक एसपीएस राठोड, ह्याने १९ वर्षापूर्वी रुचिका गिऱ्होत्रा, ह्या मुलीचा विनयभंग केला. राठोड वर खटला दाखल करण्यासाठी, आठ वर्षापेक्षा जास्त वेळ लागला. राठोडची पत्नी, व मुले, हे व्यवसायाने वकील आहेत.
दरम्यान राठोड ह्याने रुचीकाच्या कुटुंबीयांवर व त्यांचे हितचिंतक ह्यांच्यावर खोट्या केसेस (५० पेक्षा जास्त) दाखल करायला सुरुवात केली. रुचीकाच्या वडिलांवर दरोडा, खून, इत्यादी गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. तिच्या वडिलांना नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले. तिच्या भावाला, आशूला बेड्या ठोकून, त्याची, तो राहत असलेल्या ठिकाणी धिंड काढण्यात आली. पोलिसांनी आशूला कोठडीत अमानुष मारहाण केली. त्याच्यावर अनेक खोट्या केसेस करण्यात आल्या. पोलीस कोठडीत आशूच्या अंगावरून रोलर फिरविण्यात आला. आशूला पोलिसांनी अन्न पाण्याविना अनेक दिवस ठेवले. त्याला त्यांच्याच घरासमोर अमानुष मारहाण करण्यात आली. त्याचे हात पाय मोडून टाकण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडून कोऱ्या कागदांवर सही घेतली, व त्यावर त्याचा खोटा कबुलीजबाब लिहिला. रुचीकाने आपल्या भावाला झालेल्या छळामुळे १९९३ मध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. तिच्या आई वडिलांना आणि हितचिंतकांना खोट्या केसेस मध्ये गोवून, व कायद्याचा दुरुपयोग करून नरकमय यातना दिल्या गेल्या. रुचीकाच्या कुटुंबीयांवर राठोड ह्याने कायद्याच्या तरतुदींच्या आधारे अमानुष अत्याचार केला. सरतेशेवटी २००९ साली राठोडला ६ महिन्यांची कैद झाली. राठोडने रुचिका व तिच्या कुटुंबियांच्या विरुद्ध शेकडो गुन्हे व केसेस केले, पण राठोडच्या विरुद्ध फक्त एक केस !!!!!! वा रे कायदा.
पोलिसांनी ज्या खोट्या केसेस केल्या, त्याबद्दल कोणी ब्र सुद्धा उच्चारात नाही आहेत. टीव्ही चेनेल वाले फक्त मसाला लावून बातम्या सांगत आहेत. त्यांच्यासाठी हा करमणुकीचा विषय आहे. इथे लोकांचा जीव जात आहे, आणि ह्यांचा खेळ होत आहे. राष्ट्रीय महिला आयोग व इतर महिला संघटना ह्यांच्या संकुचित दृष्टिकोनामुळे , गिऱ्होत्रा कुटुंबियांना न्याय मिळणे अशक्य आहे.
ह्या सगळ्या प्रकरणाचे संक्षिप्त वर्णन म्हणजे, एका पोलीस अधिकाऱ्याने कायद्याचा आधार घेत, एका निरपराध कुटुंबाला नरकमय यातना दिल्या. जेवढा हा अधिकारी दोषी, तेवढाच दोष आपल्या न्यायसंस्थेचा, व कायद्याचा आहे. मूळ कारण आहेत, आपल्या देशाची कायदेशीर यंत्रणा. जी अतिशय भ्रष्टाचारी आहे. जीचा वापर करून निरपराध व्यक्तींना, त्रास दिला जातो. पण "आग सोमेश्वरी अन बंब रामेश्वरी". सरकारचे व महिला संघटनांचे म्हणणे असे आहे, कि आणखी एक नवीन कायदा करा. त्या नवीन कायद्या अन्वये, महिलेची छेड काढणारा कायदा बदला, व ६ महिन्या एवजी, ५ वर्षाची शिक्षा द्या. हे म्हणजे, राठोड सारख्या, माणसांना बळ देण्यासारखे आहे. म्हणजे भविष्यात ह्या कायद्याचा (गैर) वापर रुचिका सारख्यांच्या कुटुंबीयांवर आणखी खोट्या केसेस केल्या जाणार.
अशाच प्रकारे, भारतात आज अनेक व्यभिचारी स्त्रिया असाच कायद्याचा दुरुपयोग करून आपल्या पती व त्याच्या इतर नातेवाईकांच्या विरुद्ध खोट्या केसेस करून त्यांना नरकमय यातना देत आहेत. ४९८अ , हिंदू विवाह कायदा, घरगुती हिंसाचार कायदा, पोटगी साठी पत्नीच्या बाजूने उघडपणे दिले जाणारे पक्षपाती निर्णय, ह्यामुळे लाखो तरुणांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर अन्याय होत आहे. पण मुर्दाड समाज झोपलेलाच आहे.

टायगर वूड्स आणि भारतीय तरुण, एक विश्लेषण
टायगर वूड्स, म्हणजे क्रीडाविश्वातील एक आश्चर्य. एक असामान्य प्रतिभेचा खेळाडू, खऱ्या अर्थाने जीनियस. पण बिचारा, व्यक्तिगत कारणांमुळे त्याने गोल्फ पासून संन्यास घेतला आहे. त्याच्या ह्या निर्णयाने, जग एका अचाट क्षमतेच्या खेळाडूला मुकला आहे. त्याच्या ह्या निर्णयामागे एक महत्वाचे कारण आहे, आणि ते म्हणजे त्याची पत्नी. त्याचे आणि त्याच्या पत्नीचे कसल्यातरी कारणावरून बिनसले, आणि तिने टायगर वूड्सला मारहाण सुद्धा केली. अमेरिकेत विवाह्संबंधी कायदे भारतापेक्षा बरे आहेत. तर तिथे हि कथा, मग भारतात जिथे पत्नीला, कायद्याने अतिशय भयानक अस्त्र प्रदान केली आहेत, तिथे एखादी पत्नी काय करू शकते, ह्याचा जरा विचार करा. जर टायगर वूड्स, भारतीय नागरिक असता, तर त्याला त्याच्या पत्नीने एव्हाना जेलची हवा खायला पाठविले असते. समंजस अमेरिकन कायद्यांमुळे तो वाचला. आज अनेक भारतीय तरुण, असेच आपला व्यवसाय, व नोकरी सोडून, घरी बसले आहेत. त्यांचे सारे बळ, त्यांच्या पत्नीने त्यांच्या विरुद्ध केलेल्या ४९८अ, व इतर खोट्या केसेस लढण्यात वाया जात आहे. आपल्या देशातील मूर्ख कायद्यांमुळे, देशातील अनेक तरुणांची क्रयशक्ती वाया जात आहे. हे तरुण निराशेच्या गर्तेत सापडले आहेत, ते वेगळेच. आज ह्या असल्या खोट्या केसेसमुळे भारतात दरवर्षी ४,५०० कोटी रुपयांचा चुराडा होत आहे. जो पैसा देशाच्या विकासावर खर्च केला गेला पाहिजे, तो अक्षरशः वाया जात आहे. ह्या सगळ्याचे मूळ आहे, ४९८अ, हिंदू विवाह कायदा, घरगुती हिंसाचार कायदा, पोटगी साठी पत्नीच्या बाजूने उघडपणे दिले जाणारे पक्षपाती निर्णय , हे आहे . भारतीय कायदे, पत्नीच्या बाजूने फारच पक्षपाती आहेत, जे न्यायला धरून अजिबात नाही आहे.
जो देश तरुणांना असल्या प्रकारची वागणूक देतो, त्याने महासत्तेची स्वप्ने कदापि बघू नयेत. जिथे, टायगर वूड्स सारख्यावर, हि नामुष्की, तर लाखो भारतीय तरुण, हा अन्याय कसे झेलत आहेत, त्याची कल्पना करा.

Subscribe to:
Posts (Atom)