Tuesday, March 2, 2010

पत्नीने पतीला जाळून ठार केले

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=51536:2010-03-01-19-16-15&catid=50:2009-07-15-04-02-43&Itemid=61

नगर जिल्ह्यात हि पाशवी घटना घडली आहे. पत्नीने व तिच्या नातेवाईक ह्यांनी मिळून , तिच्या पतीला जाळून ठार केले.

सासरच्यांनी जावयास जाळले!
नगर, १ मार्च/प्रतिनिधी
सासरच्या लोकांनी जावयास जाळून मारले. तोफखाना पोलिसांनी या प्रकरणी पत्नीसह सहाजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. काल रात्री नऊच्या सुमारास शहरातील मोहनबाग भागात ही घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या रमेश सिदय्या महेसुनी (वय ४५, रा. श्रमिकनगर, पाईपलाईन रस्ता, सावेडी) यांचे आज सकाळी आठच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात निधन झाले. अगोदर त्यांच्या मृत्यूपूर्व जबाबानुसार खुनाच्या प्रयत्नाचे कलम लावण्यात आले होते. नंतर तोफखाना पोलिसांनी रमेश यांची पत्नी रूपाली, पूजा करनपुरे, अशोक मगर, सागर करनपुरे, शंकर करनपुरे, सनी (पूर्ण नाव माहीत नाही) या सहाजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. रमेश व त्यांची पत्नी रूपाली यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. रूपाली हिने पतीविरुद्ध फिर्यादही दिली होती. काल रात्री रमेश मोहनबाग येथे सासऱ्याच्या घरी गेले. पत्नी व सासरच्या लोकांनी फिर्याद मागे घ्यावी, असे त्यांचे म्हणणे होते. त्याचा राग येऊन पुष्पा करनपुरे व अशोक मगर यांनी रमेश यांच्या अंगावर रॉकेल व पेट्रोल टाकले. मगरने पेटवून दिले. गंभीर भाजलेल्या रमेश यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी त्यांचे निधन झाले. पोलिसांनी आरोपींविरुद्ध खुनाचा, तसेच दंगलीचाही गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक निरीक्षक भोंडवे करीत आहेत.