Monday, February 8, 2010

त्रस्त भारतीय पिता

झी मराठी वर "याला जीवन ऐसे नाव" नावाचा छान कार्यक्रम सुरु झाला आहे. ६ व ७ फेब्रुवारी च्या भागात एका पित्याला कसे त्याच्या मुलांपासून वंचित ठेवण्यात आले आहे, व त्या पित्याचा ह्या विरुद्ध लढा हा अतिशय मनाला व्यथित करणारा विषय होता. रेणुका शहाणे ह्यांनी कार्यक्रम फारच छान रीतीने प्रस्तुत केला, कुठेही भपकेबाजपणा नाही, कि खोट्या इमोशन्स नाहीत, कि भडकपणा नाही. अतिशय साधा सरळ आणि मनाला भिडणारा कार्यक्रम.

कोर्टाने पित्याला त्याच्या मुलाला भेटण्याचा आदेश देऊन सुद्धा त्या पित्याला स्वःताच्या मुलाला गेल्या १० महिन्यांपासून, साधे पाहता सुद्धा आलेले नाही. त्या गृहस्थ विरुद्ध, त्याच्या पत्नीने खोट्या केसेस हि केल्या आहेत, हा प्रकार तर हल्ली नित्याचाच झाला आहे. कोर्टाने मुलाला भेटण्याची परवानगी दिली असतानासुद्धा, त्याच्या पत्नीने, तो आदेश पायदळी तुडविला आहे, व त्याबद्दल तिला कोर्टाने काहीही जाब विचारलेला नाही आहे. त्या पित्याला त्याचे आणि त्याच्या मुलाचे संबंध कसे होते असा प्रश्न केला देला, त्यावर त्याचे उत्तर होते, जेव्हा पण तो त्याच्या मुलाला शाळेत जायचा, तेव्हा त्याचा मुलगा, आपल्या मित्रांना सांगायचा, "तो पहा माझा बेस्ट फ्रेंड" . हे उत्तर ऐकून, उपस्थितांचे डोळे, पाण्याने भरून आले. त्याच्या मुलाचे, वडिलांवर एवढे प्रेम, कि त्या लहान मुलाने, मेरेज कौन्सेलरला जाऊन स्वतः सांगितले, कि त्याला त्याच्या वडिलांबरोबर जास्त वेळ हवा आहे. जेव्हा त्याची पत्नी त्याचे घर सोडून चालली होती, तेव्हा तिला मदत करण्यासाठी, एक पोलीस हवालदार आले होते. जेव्हा तिने मुलाला नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा, मुलाने, तिला सांगितले, कि, "मम्मी, आपण पप्पांकडेच थांबूया ना" ह्यावर चिडून जाऊन त्या दुष्ट बाईने, त्या लहान मुलाला बदडून काढले. हे दृश्य पाहून, पोलीस सुद्धा हेलावले.

पत्नीसाठी त्याने चित्रपटसृष्टीमधले करियर सोडून बँकेत नोकरी केली. पत्नीच्या हट्टापायी त्याने पत्नीला ब्युटी पार्लरचा व्यवसाय उभारून दिला. आपल्या पत्नीने चांगले वाचावे, ह्यासाठी तो पत्नीला ब्रिटीश लायब्ररी सारख्या ठिकाणी घेऊन जायचा, पण सगळे पालथ्या घडावर पाणी. मुलाची अक्षम्य हेळसांड करणे, घरात अजिबात लक्ष न देणे, नवऱ्याशी नेहमी वाद विवाद घालणे, असे त्याच्या पत्नीचे वागणे असे. त्या पत्नीचे पोलिसांशी जवळचे संबंध होते. पोलिसांनी त्याला धमकावण्याचे प्रयत्न केले.
पोलीस अधिकाऱ्या बरोबर त्यांची पत्नी सलगी वाढवायला लागली, आणि त्याचे रुपांतर विवाहबाह्य संबंधात झाले. पत्नीला त्यासंबंधी जाब विचारला असता, तिने, असला काही प्रकार नाही असे सांगितले. ह्या सोबत वारंवार पती, व त्याचे आई वडील ह्यांचा अपमान करणे, असले प्रकार सुरूच होते.
त्याच्या आईने सुद्धा, सुनबाई, कशी वागायची ह्याचे अनुभव कथन केले. पतीचा नुसता अपमान करून ती थांबली नाही, तर पतीला नेहमी मारहाण सुद्धा करीत असे.

ह्या सगळ्या निराशाजनक परीस्थित SIFF ने त्यांना आशेचा किरण दाखविला. SIFF चे श्री. अजित साखरकर, ह्यांनी त्यांना नवीन उमेद दिली.


भारतात हि व्यथा, लाखो पतींची आहे. बऱ्याच जणांची परिस्थिती तर ह्याहून भयावह आहे. पुरुषोत्तम महाजन ह्यांना सुदैवाने आपले म्हणणे लोकांसमोर मांडण्याची संधी मिळाली, पण त्या लाखो पिडीत पतींचे काय, जे मूकपणे हा अन्याय निमुटपणे सहन करीत आहेत, व आत्महत्येच्या मार्गावर आहेत.

युट्युब वर त्याचे भाग ठेवण्यात आले आहेत.



http://www.youtube.com/watch?v=1zMBfTXPI88

http://www.youtube.com/watch?v=XXkz_UNxkB4

http://www.youtube.com/watch?v=7nFo_RI0Yl8

Sunday, February 7, 2010

खोटारड्या पत्नीला कोर्टाकडून शिक्षा

http://www.dnaindia.com/india/report_woman-fined-rs10000-for-alimony-lie_1340978



प्रस्तुत महिलेने, आपल्या पतीबरोबर असा समझोता केला होता, कि ती तिच्या पतीविरुद्ध कोणतीही केस करणार नाही. पण, तिने, हा समझोता मोडीत काढून, पतीविरुद्ध तक्रार दाखल करून, दरमहा रु. ३,००० मिळविले.

दिल्ली उच्च न्यायालयाने, मनजित कौर, ह्या जालंदर, पंजाब, येथील शिक्षिकेला, "कोर्टापासून, माहिती लपविण्याबद्दल " दंड केला आहे. पंजाब येथील न्यायालाकडून निर्वाह भत्ता, मिळविताना, तिने, हि गोष्ट लपवून ठेवली, कि तिला, दरमहा, रु.१०,००० पेन्शन, व, दरमहा, रु.२०,००० जमिनीच्या मालकीतून मिळत होते.

मनजितच्या पतीने, केलेल्या अपीलवर हा निर्णय देण्यात आला. मनजितचा पती, गुरबिंदर सिंग, हा सैन्यात अधिकारी आहे.
उच्च न्यायालयाने, पंजाब न्यायालयाच्या आदेशाची छाननी केली असता, त्यांना हा प्रकार लक्षात आला. कोर्टाने, असे म्हटले कि, मनजित हिने, कोर्टापासून, तिची नोकरी, व इतर उत्पन्न हे लपवून ठेवले.