Friday, June 12, 2009

लिंगभेदी भारतीय कायदे

भारतीय कायदे असे मानून चालतात कि स्त्री हि अबला नारी आहे, आणि तिला संरक्षणाची गरज आहे. पूर्वीच्याकाळी हे सर्व ठीक होते. पण सध्याचे युग हे स्त्री पुरूष समानतेचे युग आहे. काळ बदलला आहे. सध्या स्त्रिया अनेक क्षेत्रात पुरुषांशी बरोबरी करीत आहेत, आणि हि चांगली गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो किपुरुष स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे.

जसे स्त्रिया पुरुषांशी चांगल्या बाबींमध्ये स्पर्धा करित्त आहेत, तसेच काही स्त्रिया पुरुषांशी गुन्हेगारी मध्येसुधा स्पर्धा करीत आहेत.

अनेक शहरी स्त्रिया आपला नवरा आपल्या मुठीत कसा राहील हेच बघत असतात. अशा स्त्रियांची काळजीघेण्यासाठी सरकारने अनेक कायदे केले आहेत. IPC ४९८अ हा ह्या सगळ्या कायद्यांमध्ये सर्वात पुढे आहे. ह्याकायद्याअन्वेय कुठलीही पत्नी पोलीस स्टेशन मध्ये, कुठल्याही पुराव्या शिवाय तिचे पती, सासू, सासरे, पतीच्या कोणत्याही नातेवाईका विरुद्ध तक्रार करू शकते. आणि पोलीस त्या तक्रारीची दखल घेऊन, त्या स्त्रीने ज्यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे, त्या सर्वांना अटक करतात. (मी मुद्दाम करू शकतात असे लिहिले नाही, कारण पोलीस अटक करतातच)

2 comments:

  1. Police aatak karatatach.
    Vakil(adocate) pan suggest karata kahi nasel tar 498a file kara.

    Women organisation pan suggest karatat kahich nasel tar 498A taka without any reason.

    Basically ha sagalyache percentage(%) taralele aaste.

    ReplyDelete