Wednesday, July 7, 2010

राष्ट्रीय महिला आयोग - भ्रष्टाचाराचे कुरण भाग १

राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना खरेतर झाली होती, महिलांना समान हक्क मिळावे ह्या उद्देश्याने झाली होती. इतरही अनेक आदर्शवादी धोरणे डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केली गेली. पण ह्या आयोगाची गेली वीस वर्षातली कामगिरी बघितली तर खरेच ह्या आयोगाची गरज काय आहे हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.   नुकताच ह्या आयोगाचा लेख परीक्षकांचा अहवाल वाचनात आला. ह्या अहवालात बरीच धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. ह्या अगोदर पण माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त झालेल्या माहिती मध्ये हे स्पष्ट झाले होते कि हुंड्या सारख्या प्रथेविरुद्ध आयोगाने एक पैसा देखील खर्च केलेला नाही आहे.

Tuesday, March 2, 2010

पत्नीने पतीला जाळून ठार केले

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=51536:2010-03-01-19-16-15&catid=50:2009-07-15-04-02-43&Itemid=61

नगर जिल्ह्यात हि पाशवी घटना घडली आहे. पत्नीने व तिच्या नातेवाईक ह्यांनी मिळून , तिच्या पतीला जाळून ठार केले.

सासरच्यांनी जावयास जाळले!
नगर, १ मार्च/प्रतिनिधी
सासरच्या लोकांनी जावयास जाळून मारले. तोफखाना पोलिसांनी या प्रकरणी पत्नीसह सहाजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. काल रात्री नऊच्या सुमारास शहरातील मोहनबाग भागात ही घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या रमेश सिदय्या महेसुनी (वय ४५, रा. श्रमिकनगर, पाईपलाईन रस्ता, सावेडी) यांचे आज सकाळी आठच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात निधन झाले. अगोदर त्यांच्या मृत्यूपूर्व जबाबानुसार खुनाच्या प्रयत्नाचे कलम लावण्यात आले होते. नंतर तोफखाना पोलिसांनी रमेश यांची पत्नी रूपाली, पूजा करनपुरे, अशोक मगर, सागर करनपुरे, शंकर करनपुरे, सनी (पूर्ण नाव माहीत नाही) या सहाजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. रमेश व त्यांची पत्नी रूपाली यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. रूपाली हिने पतीविरुद्ध फिर्यादही दिली होती. काल रात्री रमेश मोहनबाग येथे सासऱ्याच्या घरी गेले. पत्नी व सासरच्या लोकांनी फिर्याद मागे घ्यावी, असे त्यांचे म्हणणे होते. त्याचा राग येऊन पुष्पा करनपुरे व अशोक मगर यांनी रमेश यांच्या अंगावर रॉकेल व पेट्रोल टाकले. मगरने पेटवून दिले. गंभीर भाजलेल्या रमेश यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी त्यांचे निधन झाले. पोलिसांनी आरोपींविरुद्ध खुनाचा, तसेच दंगलीचाही गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक निरीक्षक भोंडवे करीत आहेत.

Monday, February 8, 2010

त्रस्त भारतीय पिता

झी मराठी वर "याला जीवन ऐसे नाव" नावाचा छान कार्यक्रम सुरु झाला आहे. ६ व ७ फेब्रुवारी च्या भागात एका पित्याला कसे त्याच्या मुलांपासून वंचित ठेवण्यात आले आहे, व त्या पित्याचा ह्या विरुद्ध लढा हा अतिशय मनाला व्यथित करणारा विषय होता. रेणुका शहाणे ह्यांनी कार्यक्रम फारच छान रीतीने प्रस्तुत केला, कुठेही भपकेबाजपणा नाही, कि खोट्या इमोशन्स नाहीत, कि भडकपणा नाही. अतिशय साधा सरळ आणि मनाला भिडणारा कार्यक्रम.

कोर्टाने पित्याला त्याच्या मुलाला भेटण्याचा आदेश देऊन सुद्धा त्या पित्याला स्वःताच्या मुलाला गेल्या १० महिन्यांपासून, साधे पाहता सुद्धा आलेले नाही. त्या गृहस्थ विरुद्ध, त्याच्या पत्नीने खोट्या केसेस हि केल्या आहेत, हा प्रकार तर हल्ली नित्याचाच झाला आहे. कोर्टाने मुलाला भेटण्याची परवानगी दिली असतानासुद्धा, त्याच्या पत्नीने, तो आदेश पायदळी तुडविला आहे, व त्याबद्दल तिला कोर्टाने काहीही जाब विचारलेला नाही आहे. त्या पित्याला त्याचे आणि त्याच्या मुलाचे संबंध कसे होते असा प्रश्न केला देला, त्यावर त्याचे उत्तर होते, जेव्हा पण तो त्याच्या मुलाला शाळेत जायचा, तेव्हा त्याचा मुलगा, आपल्या मित्रांना सांगायचा, "तो पहा माझा बेस्ट फ्रेंड" . हे उत्तर ऐकून, उपस्थितांचे डोळे, पाण्याने भरून आले. त्याच्या मुलाचे, वडिलांवर एवढे प्रेम, कि त्या लहान मुलाने, मेरेज कौन्सेलरला जाऊन स्वतः सांगितले, कि त्याला त्याच्या वडिलांबरोबर जास्त वेळ हवा आहे. जेव्हा त्याची पत्नी त्याचे घर सोडून चालली होती, तेव्हा तिला मदत करण्यासाठी, एक पोलीस हवालदार आले होते. जेव्हा तिने मुलाला नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा, मुलाने, तिला सांगितले, कि, "मम्मी, आपण पप्पांकडेच थांबूया ना" ह्यावर चिडून जाऊन त्या दुष्ट बाईने, त्या लहान मुलाला बदडून काढले. हे दृश्य पाहून, पोलीस सुद्धा हेलावले.

पत्नीसाठी त्याने चित्रपटसृष्टीमधले करियर सोडून बँकेत नोकरी केली. पत्नीच्या हट्टापायी त्याने पत्नीला ब्युटी पार्लरचा व्यवसाय उभारून दिला. आपल्या पत्नीने चांगले वाचावे, ह्यासाठी तो पत्नीला ब्रिटीश लायब्ररी सारख्या ठिकाणी घेऊन जायचा, पण सगळे पालथ्या घडावर पाणी. मुलाची अक्षम्य हेळसांड करणे, घरात अजिबात लक्ष न देणे, नवऱ्याशी नेहमी वाद विवाद घालणे, असे त्याच्या पत्नीचे वागणे असे. त्या पत्नीचे पोलिसांशी जवळचे संबंध होते. पोलिसांनी त्याला धमकावण्याचे प्रयत्न केले.
पोलीस अधिकाऱ्या बरोबर त्यांची पत्नी सलगी वाढवायला लागली, आणि त्याचे रुपांतर विवाहबाह्य संबंधात झाले. पत्नीला त्यासंबंधी जाब विचारला असता, तिने, असला काही प्रकार नाही असे सांगितले. ह्या सोबत वारंवार पती, व त्याचे आई वडील ह्यांचा अपमान करणे, असले प्रकार सुरूच होते.
त्याच्या आईने सुद्धा, सुनबाई, कशी वागायची ह्याचे अनुभव कथन केले. पतीचा नुसता अपमान करून ती थांबली नाही, तर पतीला नेहमी मारहाण सुद्धा करीत असे.

ह्या सगळ्या निराशाजनक परीस्थित SIFF ने त्यांना आशेचा किरण दाखविला. SIFF चे श्री. अजित साखरकर, ह्यांनी त्यांना नवीन उमेद दिली.


भारतात हि व्यथा, लाखो पतींची आहे. बऱ्याच जणांची परिस्थिती तर ह्याहून भयावह आहे. पुरुषोत्तम महाजन ह्यांना सुदैवाने आपले म्हणणे लोकांसमोर मांडण्याची संधी मिळाली, पण त्या लाखो पिडीत पतींचे काय, जे मूकपणे हा अन्याय निमुटपणे सहन करीत आहेत, व आत्महत्येच्या मार्गावर आहेत.

युट्युब वर त्याचे भाग ठेवण्यात आले आहेत.http://www.youtube.com/watch?v=1zMBfTXPI88

http://www.youtube.com/watch?v=XXkz_UNxkB4

http://www.youtube.com/watch?v=7nFo_RI0Yl8

Sunday, February 7, 2010

खोटारड्या पत्नीला कोर्टाकडून शिक्षा

http://www.dnaindia.com/india/report_woman-fined-rs10000-for-alimony-lie_1340978प्रस्तुत महिलेने, आपल्या पतीबरोबर असा समझोता केला होता, कि ती तिच्या पतीविरुद्ध कोणतीही केस करणार नाही. पण, तिने, हा समझोता मोडीत काढून, पतीविरुद्ध तक्रार दाखल करून, दरमहा रु. ३,००० मिळविले.

दिल्ली उच्च न्यायालयाने, मनजित कौर, ह्या जालंदर, पंजाब, येथील शिक्षिकेला, "कोर्टापासून, माहिती लपविण्याबद्दल " दंड केला आहे. पंजाब येथील न्यायालाकडून निर्वाह भत्ता, मिळविताना, तिने, हि गोष्ट लपवून ठेवली, कि तिला, दरमहा, रु.१०,००० पेन्शन, व, दरमहा, रु.२०,००० जमिनीच्या मालकीतून मिळत होते.

मनजितच्या पतीने, केलेल्या अपीलवर हा निर्णय देण्यात आला. मनजितचा पती, गुरबिंदर सिंग, हा सैन्यात अधिकारी आहे.
उच्च न्यायालयाने, पंजाब न्यायालयाच्या आदेशाची छाननी केली असता, त्यांना हा प्रकार लक्षात आला. कोर्टाने, असे म्हटले कि, मनजित हिने, कोर्टापासून, तिची नोकरी, व इतर उत्पन्न हे लपवून ठेवले.

Sunday, January 10, 2010

पत्नीच्या खोट्या पोलीस तक्रारीला कंटाळून पतीची आत्महत्या

कोलकाता येथे राहणाऱ्या, हिरेन सरकार, वय, ३८ वर्षीय, ह्याने, आत्महत्या केली. मृत्युपूर्वी लिहिलेल्या पत्रात त्याने, त्याच्या पत्नीने केलेल्या खोट्या पोलीस केस मुळे, त्रस्त होऊन आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. त्याची पत्नी महुआ हिने, ६ जून २००९ साली, त्याच्या विरुद्ध ४९८अ अन्वये, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती.

हीच आत्महत्या, जर एका पत्नीने केली असती, तर टीव्ही चेनेल वर दिवस रात्र हि बातमी दिसली असती.

http://www.telegraphindia.com/1090827/jsp/calcutta/story_11414324.jsp

Saturday, January 9, 2010

रुचिका गिऱ्होत्रा प्रकरण आणि भारतीय कायदे

सध्या रुचिका गिऱ्होत्रा ह्या तरुणीने केलेली आत्महत्या, हा विषय फारच चर्चिला जात आहे. हे प्रकरण काय आहे ते पाहूया.

हरयाणाचे माजी पोलीस महासंचालक एसपीएस राठोड, ह्याने १९ वर्षापूर्वी रुचिका गिऱ्होत्रा, ह्या मुलीचा विनयभंग केला. राठोड वर खटला दाखल करण्यासाठी, आठ वर्षापेक्षा जास्त वेळ लागला. राठोडची पत्नी, व मुले, हे व्यवसायाने वकील आहेत.

दरम्यान राठोड ह्याने रुचीकाच्या कुटुंबीयांवर व त्यांचे हितचिंतक ह्यांच्यावर खोट्या केसेस (५० पेक्षा जास्त) दाखल करायला सुरुवात केली. रुचीकाच्या वडिलांवर दरोडा, खून, इत्यादी गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. तिच्या वडिलांना नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले. तिच्या भावाला, आशूला बेड्या ठोकून, त्याची, तो राहत असलेल्या ठिकाणी धिंड काढण्यात आली. पोलिसांनी आशूला कोठडीत अमानुष मारहाण केली. त्याच्यावर अनेक खोट्या केसेस करण्यात आल्या. पोलीस कोठडीत आशूच्या अंगावरून रोलर फिरविण्यात आला. आशूला पोलिसांनी अन्न पाण्याविना अनेक दिवस ठेवले. त्याला त्यांच्याच घरासमोर अमानुष मारहाण करण्यात आली. त्याचे हात पाय मोडून टाकण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडून कोऱ्या कागदांवर सही घेतली, व त्यावर त्याचा खोटा कबुलीजबाब लिहिला. रुचीकाने आपल्या भावाला झालेल्या छळामुळे १९९३ मध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. तिच्या आई वडिलांना आणि हितचिंतकांना खोट्या केसेस मध्ये गोवून, व कायद्याचा दुरुपयोग करून नरकमय यातना दिल्या गेल्या. रुचीकाच्या कुटुंबीयांवर राठोड ह्याने कायद्याच्या तरतुदींच्या आधारे अमानुष अत्याचार केला. सरतेशेवटी २००९ साली राठोडला ६ महिन्यांची कैद झाली. राठोडने रुचिका व तिच्या कुटुंबियांच्या विरुद्ध शेकडो गुन्हे व केसेस केले, पण राठोडच्या विरुद्ध फक्त एक केस !!!!!! वा रे कायदा.

पोलिसांनी ज्या खोट्या केसेस केल्या, त्याबद्दल कोणी ब्र सुद्धा उच्चारात नाही आहेत. टीव्ही चेनेल वाले फक्त मसाला लावून बातम्या सांगत आहेत. त्यांच्यासाठी हा करमणुकीचा विषय आहे. इथे लोकांचा जीव जात आहे, आणि ह्यांचा खेळ होत आहे. राष्ट्रीय महिला आयोग व इतर महिला संघटना ह्यांच्या संकुचित दृष्टिकोनामुळे , गिऱ्होत्रा कुटुंबियांना न्याय मिळणे अशक्य आहे.


ह्या सगळ्या प्रकरणाचे संक्षिप्त वर्णन म्हणजे, एका पोलीस अधिकाऱ्याने कायद्याचा आधार घेत, एका निरपराध कुटुंबाला नरकमय यातना दिल्या. जेवढा हा अधिकारी दोषी, तेवढाच दोष आपल्या न्यायसंस्थेचा, व कायद्याचा आहे. मूळ कारण आहेत, आपल्या देशाची कायदेशीर यंत्रणा. जी अतिशय भ्रष्टाचारी आहे. जीचा वापर करून निरपराध व्यक्तींना, त्रास दिला जातो. पण "आग सोमेश्वरी अन बंब रामेश्वरी". सरकारचे व महिला संघटनांचे म्हणणे असे आहे, कि आणखी एक नवीन कायदा करा. त्या नवीन कायद्या अन्वये, महिलेची छेड काढणारा कायदा बदला, व ६ महिन्या एवजी, ५ वर्षाची शिक्षा द्या. हे म्हणजे, राठोड सारख्या, माणसांना बळ देण्यासारखे आहे. म्हणजे भविष्यात ह्या कायद्याचा (गैर) वापर रुचिका सारख्यांच्या कुटुंबीयांवर आणखी खोट्या केसेस केल्या जाणार.अशाच प्रकारे, भारतात आज अनेक व्यभिचारी स्त्रिया असाच कायद्याचा दुरुपयोग करून आपल्या पती व त्याच्या इतर नातेवाईकांच्या विरुद्ध खोट्या केसेस करून त्यांना नरकमय यातना देत आहेत. ४९८अ , हिंदू विवाह कायदा, घरगुती हिंसाचार कायदा, पोटगी साठी पत्नीच्या बाजूने उघडपणे दिले जाणारे पक्षपाती निर्णय, ह्यामुळे लाखो तरुणांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर अन्याय होत आहे. पण मुर्दाड समाज झोपलेलाच आहे.

टायगर वूड्स आणि भारतीय तरुण, एक विश्लेषण

टायगर वूड्स, म्हणजे क्रीडाविश्वातील एक आश्चर्य. एक असामान्य प्रतिभेचा खेळाडू, खऱ्या अर्थाने जीनियस. पण बिचारा, व्यक्तिगत कारणांमुळे त्याने गोल्फ पासून संन्यास घेतला आहे. त्याच्या ह्या निर्णयाने, जग एका अचाट क्षमतेच्या खेळाडूला मुकला आहे. त्याच्या ह्या निर्णयामागे एक महत्वाचे कारण आहे, आणि ते म्हणजे त्याची पत्नी. त्याचे आणि त्याच्या पत्नीचे कसल्यातरी कारणावरून बिनसले, आणि तिने टायगर वूड्सला मारहाण सुद्धा केली. अमेरिकेत विवाह्संबंधी कायदे भारतापेक्षा बरे आहेत. तर तिथे हि कथा, मग भारतात जिथे पत्नीला, कायद्याने अतिशय भयानक अस्त्र प्रदान केली आहेत, तिथे एखादी पत्नी काय करू शकते, ह्याचा जरा विचार करा. जर टायगर वूड्स, भारतीय नागरिक असता, तर त्याला त्याच्या पत्नीने एव्हाना जेलची हवा खायला पाठविले असते. समंजस अमेरिकन कायद्यांमुळे तो वाचला. आज अनेक भारतीय तरुण, असेच आपला व्यवसाय, व नोकरी सोडून, घरी बसले आहेत. त्यांचे सारे बळ, त्यांच्या पत्नीने त्यांच्या विरुद्ध केलेल्या ४९८अ, व इतर खोट्या केसेस लढण्यात वाया जात आहे. आपल्या देशातील मूर्ख कायद्यांमुळे, देशातील अनेक तरुणांची क्रयशक्ती वाया जात आहे. हे तरुण निराशेच्या गर्तेत सापडले आहेत, ते वेगळेच. आज ह्या असल्या खोट्या केसेसमुळे भारतात दरवर्षी ४,५०० कोटी रुपयांचा चुराडा होत आहे. जो पैसा देशाच्या विकासावर खर्च केला गेला पाहिजे, तो अक्षरशः वाया जात आहे. ह्या सगळ्याचे मूळ आहे, ४९८अ, हिंदू विवाह कायदा, घरगुती हिंसाचार कायदा, पोटगी साठी पत्नीच्या बाजूने उघडपणे दिले जाणारे पक्षपाती निर्णय , हे आहे . भारतीय कायदे, पत्नीच्या बाजूने फारच पक्षपाती आहेत, जे न्यायला धरून अजिबात नाही आहे.

जो देश तरुणांना असल्या प्रकारची वागणूक देतो, त्याने महासत्तेची स्वप्ने कदापि बघू नयेत. जिथे, टायगर वूड्स सारख्यावर, हि नामुष्की, तर लाखो भारतीय तरुण, हा अन्याय कसे झेलत आहेत, त्याची कल्पना करा.